शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पेणमध्ये वाशी खारेपाटात पाणीटंचाई, टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची जनतेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 06:31 IST

public demand for water supply by tanker : चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे वेळापत्रक राबविण्यात येऊन देखील गेले दहा दिवस पाणीपुरवठा न झाल्याने महिला वर्गांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

पेण : शहापाडा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेमधील २७ गावे ४३ वाड्यांना पाणीपुरवठा करणारे शहापाडा धरणातील पाणीसाठा संपूर्णपणे संपला आहे. जनतेला पिण्याचे पाणी उपलब्ध कसे करायचे हा मोठा गहन प्रश्न सध्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला सतावतो आहे. चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे वेळापत्रक राबविण्यात येऊन देखील गेले दहा दिवस पाणीपुरवठा न झाल्याने महिला वर्गांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.  सरकारकडून कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधक उपाययोजना म्हणून टाळेबंदीचा इशारा देण्यात आला आहे. जर टाळेबंदी लागू केली तर पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी काय करावे या भीषण पाणीटंचाई समस्येमुळे महिलांची झोप उडाली आहे. रायगड जिल्हाधिकारी यांनी या समस्येचा निपटारा करण्यासाठी टँकरद्वारे टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करावा अशी मागणी महिलांकडून करण्यात आली आहे.      तहानेने व्याकूळ झालेल्या वाशी विभागातील जनतेला पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला भविष्याचे नियोजन करता आले नाही. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत ३० कोटीची हेटवणे शहापाडा धरणांना जोडणारी योजनेचे काम अपूर्ण आहे. काम करणारा ठेकेदार अर्धवट काम सोडून पळून गेल्यावर दीड वर्षात एमजेपीच्या अधिकाऱ्यांने काय दिवे लावले येथील पाणीटंचाई समस्येची इथंभूत माहिती या यंत्रणांना असून देखील राजकीय नाकर्तेपणामुळे जनतेला पिण्याचे पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे.

समस्या २५ वर्षांपासून कायमपाणीटंचाईची समस्या तब्बल २५ वर्षे कायम ठाण मांडून बसली आहे. दरवर्षी मार्चमध्ये सुरू होणारी पाणीटंचाई समस्येची दाहकता यावर्षी मात्र फेब्रुवारी महिन्याच्या प्रारंभी सुरू झाली आहे. गेले २० दिवस जनतेला गढूळ पाणीपुरवठा होत होता तोही आता कमी दाबाने जेमतेम होतो आहे. गावातील पाच टक्के घरांना पाणीपुरवठा होतो. ९५ टक्के घरांमध्ये ठणठणाट असतो. ग्रामीण पाणीपुरवठा अधिकारी यांनी पहाणी केली. 

पाण्यासाठी बैठकांचा सिलसिला जूनचा पाऊस पडेपर्यंत करायचे काय याचे प्रशासनाला उत्तर द्यावे लागेल. पाण्याने श्रीमंत असलेल्या हेटवणे धरणाचे पाणी सिडकोची तहान भागवत आहे. मात्र स्थानिक जनतेला पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी भटकावे लागते. पाण्यासाठी बैठकांचा सिलसिला सुरू असतो मात्र​ याबाबत उपाययोजना करण्यात प्रशासनाला नेहमीच अपयश येते. आता तरी टँकर सुरु करुन तहानलेल्या गावांना पाणीपुरवठा करावा ही मागणी आहे.

टॅग्स :RaigadरायगडWaterपाणी