शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

टाटाने केले बाय बाय अन् उधाणाने शहापूरकर बेहाल; कंपनीने आश्वासन पाळले नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2023 06:32 IST

खार बंदिस्ती नसल्याने तीन दिवसांपासून शेतांमध्ये पूरस्थिती

अलिबाग - टाटा विद्युत प्रकल्पासाठी शहापूर, मोठे शहापूर, धेरंड गावात शेतकऱ्यांनी एमआयडीसीमार्फत जमीन दिली होती. मात्र, १३ वर्षांनंतरही ना प्रकल्प झाला ना शेतकऱ्यांना लाभ मिळाला. खार बंदिस्ती नसल्याने गेले तीन दिवस उधाण येऊन खाडीतील पाणी येथील ग्रामस्थांच्या घरात घुसत आहे. त्यामुळे शहापूर, धेरंड ग्रामस्थांच्या घरांसह शेतीचेही नुकसान होत आहे. 

स्थानिकांच्या या समस्येकडे एमआयडीसी तसेच प्रशासनाला लक्ष द्यायला वेळ नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे  प्रकल्पाला जमिनी देऊन डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ स्थानिकांवर आली आहे. येथील शेकडो एकर शेतजमीन टाटा विद्युत प्रकल्पासाठी शेतकऱ्यांनी १३ वर्षांपूर्वी दिली होती. नव्या प्रकल्पामुळे या भागाचा विकास होऊन रोजगार निर्मिती होईल, अशी आशा होती. एमआयडीसीमार्फत जमीन भूसंपादित करण्यात आली. टाटा वीज प्रकल्पाच्या प्रशासनानेही गावाच्या परिसरात असलेली शेतीची खार बंदिस्ती करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, कंपनीने आश्वासन तर पाळले नाहीच उलट प्रकल्पही गुंडाळला. 

खाडीमधील उधाणापासून शेतीचा बचाव व्हावा, यासाठी स्थानिक ग्रामस्थ वेळोवेळी स्वखर्चाने बांधबंदिस्ती करत होते. खासगी प्रकल्पाला जमीन दिल्याने खारभूमी विभागही खार बंदिस्तीकडे दुर्लक्ष करत आहे. अंधेरी येथील एमआयडीसी कार्यालयात अनेकवेळा गाव कमिटीने जाऊन समस्या मांडली. मात्र, त्यांनीही दुर्लक्ष केले आहे. प्रशासनही ग्रामस्थांची समस्या सोडविण्यात अपयशी ठरले आहे. 

स्थानिकांची नुकसानभरपाईची मागणी सोमवारपासून मोठे उधाण असल्याने आणि गावाची खार बंदिस्ती नसल्याने पाणी घरात, शेततळी, शेतात घुसत आहे. गेल्या तीन दिवसांपासून स्थानिक हा त्रास सहन करत आहेत. शेततळ्यात खारे पाणी घुसल्याने तळ्यातील मासेही उधाणात गेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसत आहे. सामानाचे नुकसान झाले आहे. धेरंड गावात ३२०, मोठा शहापूर येथे ४७० तर धाकटी शहापूरला ३७५ घरे आहेत. ८० टक्के घरांमध्ये पाणी घुसले आहे.