शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रायगडवर पाणीटंचाईचे संकट; जिल्ह्यातील ११९ गावे, वाड्यांना झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 01:39 IST

पेण, रोहा, पोलादपूर, महाड तालुक्यात समस्या

- निखिल म्हात्रे अलिबाग : रायगड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच अनेक भागांत आता पाणीटंचाईचेही सावट निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील ११९ गावे आणि वाड्यांमध्ये टंचाईच्या झळा जाणवण्यास सुरुवात झाली आहे.रायगड जिल्ह्यात दरवर्षी सरासरी ३ हजार मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र, गेल्या वर्षी साडेचार हजार मिलिमीटर पावसाची जिल्ह्यात नोंद झाली. सरासरीपेक्षा कितीतरी जास्त पाऊस झाल्याने यंदा रायगड जिल्ह्यात पाणीटंचाई जाणवणार नाही, अशी अपेक्षा होती. मात्र, एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून पेण, रोहा, पोलादपूर आणि महाड तालुक्यातील अनेक गावांत पाणी समस्या निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे.पेण तालुक्यात ९ गावे, ६१ वाड्या, रोहा तालुक्यात ४ गावे, २ वाड्या, महाड तालुक्यात १ गाव २ वाड्या, तर पोलादपूर तालुक्यात १३ गाव, २७ वाड्या अशा ११९ गाव-वाड्या तहानेने व्याकुळ झाल्या आहेत. त्यामुळे हंडाभर पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ येथील ग्रामस्थांवर आली आहे. ही बाब लक्षात घेऊन आता १२ टँकर्सच्या मदतीने या गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे.पाणीटंचाई असलेल्या गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. गरज असेल तेथे विंधन विहिरी खोदण्याचे काम हाती घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. काही ठिकाणी पाणी योजनांची कामे पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत, असे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी ‘लोकमत’ला सांगितले.पोलादपूरमधील ४० गावांना चार टँकरने पाणीपोलादपूर : एकीकडे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव तर दुसरीकडे पाणीटंचाईग्रस्त गावांची वाढती संख्या या दुहेरी संकटाचा सामना सध्या ठिकठिकाणी करावा लागत आहे. पोलादपूर तालुक्यातील १३ गावे २७ वाड्यांसाठी तालुक्यातील तीन टँकर मालकांच्या चार टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असल्याची माहिती पंचायत समिती पाणीपुरवठा विभागामार्फत देण्यात आली.पोलादपूर तालुक्यात १ एप्रिल ते ३० जून या कालावधीत पाणीटंचाई कृती आराखड्यामध्ये ४६ गावे आणि १२३ वाड्यांचा समावेश टंचाई निवारण आराखड्यात करण्यात आला होता. यापैकी सद्य:स्थितीत १३ गावे २७ वाड्यांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या टंचाईग्रस्त ४0 गाव-वाड्यांमध्ये केवनाळे, चांभारगणी बु. व खुर्द, किनेश्वर, निवे, ताम्हाणे, आड, दाभिळ, सडेकोंड, सडे, बोरघर, वाकण, नानेघोळ या गावांसह केवनाळे आंबेमाची, बोरघर बौद्धवाडी, महादेवाचा मुरा, वडघर - दिवाळवाडी, सनसपेढा, पवारवाडी, उलालवाडी, सणसवाडी, फौजदारवाडी तर कामथे येथील जांभडी, फौजदारवाडी, शेंबिवाडी, आदिवासीवाडी, देऊळवाडी किनेश्वर, मोरसाडे गावातील वाड्यांना चार टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असल्याची माहिती पंचायत समिती पाणीपुरवठा विभागामार्फत देण्यात आली.कोणीही पाण्यावाचून राहणार नाही - कांबळेपोलादपूर तालुक्यातील १३ गावे २७ वाड्यांना चार टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे, तर १ गाव, ८ वाड्यांसाठी प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठवला आहे, तो प्रलंबित आहे. २१ एप्रिल रोजी ६ गावे व ४ वाड्यांचे मागणी अर्ज पंचायत समिती येथे प्राप्त झाले आहेत. हे अर्ज लवकर जिल्हा प्रशासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येतील, अशी माहिती पोलादपूर पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाचे जी.ई. कांबळे यांनी दिली आहे. कोणतीही गाव-वाडी पाण्यापासून वंचित राहणार नाही यासाठी महसूल तालुका प्रशासन व पंचायत समिती प्रशासन प्रयत्नशील आहे, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई