नागोठणे : विभागातील एका कंपनीत आणलेल्या दोन टँकरमधील आॅईलमध्ये जादा प्रमाणात पाणी मिसळले असल्याचे आढळून आल्याने कंपनीच्या तक्र ारीवरून दोन्ही चालकांच्या विरोधात नागोठणे पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चालकांसह टँकर ताब्यात घेण्यात आला आले. मुंबई, शिवडी येथील एका कंपनीत फर्नेस आॅईल भरून (एमएच 04 जी सी 9523)आणि (एमएच 04 एफ पी 6684) क्र मांकाचे दोन टँकर सुकेळीतील महाराष्ट्र सीमलेस कंपनीत आले होते. आॅईल खाली करताना त्यात जादा पाणी असल्याचे संशय कर्मचाऱ्यांना आल्याने त्यांनी संबंधीत आॅईलची प्रयोगशाळेत तपासणी केली. याप्रकरणी कंपनीचे अधिकरी अनिल नायर यांनी नागोठणे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविल्यानंतर चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
आॅइलमध्ये पाण्याची भेसळ
By admin | Updated: September 5, 2015 23:05 IST