शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

कर्जतमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीत वाक् युद्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2024 12:26 IST

दोन्ही गटांकडून महायुतीचा धर्म पाळण्याचे पदाधिकाऱ्यांकडून आवाहन

अलिबाग : शिवसेनेच्या (शिंदे गट) पेण येथील मेळाव्यात कर्जतचे आमदार महेंद्र दळवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर कर्जत विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना महायुतीच्या नेत्यांमध्ये टीकेचे द्वंद्व सुरू झाले आहे.

दरम्यान, आता दोन्ही गटांकडून महायुतीचा धर्म सर्वांनीच पाळावा, असेही आवाहन करण्यात येत आहे. आमदार महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरे यांच्यावर विश्वास कोण ठेवणार, असा सवाल उपस्थित केला होता. यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन्ही नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. 

भाई गायकर यांचा पलटवारसुनील तटकरे यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुधाकर घारे यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर देऊन शिवसेनेला डिवचले. तुम्ही कडेलोट करणार असाल तर आम्ही हत्तीच्या पायाखाली तुडवू, अशी टीका घारे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर केली आहे. यानंतर शिवसेनेनेही कर्जत येथे बुधवारी पत्रकार परिषद घेऊन थेट उत्तर दिले आहे. शिवसेना उपजिल्हाप्रमुख भाई गायकर यांनीही घारे यांच्या टीकेला उत्तर दिले आहे. हत्ती कोण हे कोणी ठरवले. आम्ही तुम्हाला मुंगीसारखे समजतो, असा पलटवार गायकर यांनी केला आहे. अशा स्वरूपात  शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.

टॅग्स :Raigadरायगडalibaugअलिबाग