शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

छत्तीस देशांतील शासकीय अधिकाऱ्यांची जेएनपीटीला भेट  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2018 03:28 IST

भारतातील जेएनपीटी बंदराला मोठ्या संख्येने भेट देणाºया विदेशी शिष्टमंडळासाठी विशेष अभ्यास दौºयाचे आयोजन जेएनपीटीने केले होते.

उरण : भारतातील जेएनपीटी बंदराला मोठ्या संख्येने भेट देणाºया विदेशी शिष्टमंडळासाठी विशेष अभ्यास दौºयाचे आयोजन जेएनपीटीने केले होते. विदेश मंत्रालयाच्या सहकार्याने आयटीईसीने ग्लोबल स्ट्रॅटेजिक ग्रोथ लीडरशीप व सस्टेनेबल डेव्हलपमेंट कार्यक्रम आयोजित केला होता, ज्यामध्ये ३६ देशातील ३८ शासकीय अधिकाºयांनी सहभाग नोंदवला.या शिष्टमंडळामध्ये त्रिनिदाद व टोबॅको, क्युबा, इराक, श्रीलंका, नायजेरिया, कोलोम्बिया, दक्षिण आफ्रिका, इजिप्त, जीनिया, पेरू, केनिया आणि व्हिएतनाम यांसारख्या देशातील प्रतिनिधी सहभागी झाले. जेएनपीटीचे प्रभारी अध्यक्ष नीरज बन्सल म्हणाले की, जागतिक कंटेनर कार्गो व्यवसायामध्ये जेएनपीटी लक्षणीय सहयोग नोंदवत असून, या प्रगतीसाठी कसोशीने प्रयत्न करीत आहे. तसेच देशातील प्रमुख बंदरांपैकी ५३ टक्के कंटेनर कार्गो हाताळणी जेएनपीटीमधून केली जाते. जागतिक दृष्टिकोनातून जेएनपीटी पोर्टच्या कामकाजाची माहिती समजून घेण्यासाठी विविध देशांतील प्रतिनिधी एकत्र आले आहेत. अशा प्रकारचे सहकार्याचे प्रयत्न भारताला इतर जगाशी व्यापारी संबंध वृद्धिंगत करण्यास तसेच देशाच्या आर्थिक क्षेत्राला प्रोत्साहन देतात.या दौºयात शिष्टमंडळाने प्रथम बंदर परिसराला भेट दिली. त्यानंतर त्यांनी जेएनपीटी व पोर्ट अँटवर्प यांच्या सयुंक्तरीत्या उभारण्यात आलेल्या एपेक ट्रेनिंग सेंटरला भेट दिली. जेएनपीटी अधिकारी व शिष्टमंडळ यांच्यात पोर्टच्या कामकाजाविषयी व विविध उपक्रमांविषयी सखोल चर्चा झाली. शिष्टमंडळाने जेएनपीटीचे एकंदर कामकाज तसेच खास करून इज आॅफ डुइंग बिजनेस उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केलेल्या विविध प्रकल्पांचे अवलोकन केले.

टॅग्स :JNPTजेएनपीटीRaigadरायगड