शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

विक्रमगडमध्ये 400 कुटुंबांवर आली अंधारात राहण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 00:30 IST

वीजजोडणीची प्रतीक्षा : वीज मीटरच्या तुटवड्याचे महावितरणचे कारण

- राहुल वाडेकरलोकमत न्यूज नेटवर्कविक्रमगड : राज्यभरात अनेकांना हजारोंची वीजबिले आलेली आहेत. तर दुसरीकडे विक्रमगड तालुक्यातील शेकडो नागरिक वीजजोडणी मिळावी या प्रतीक्षेत आहेत. तालुक्यातील ४०० नागरिकांनी वीजजोडणीसाठी अर्ज केले आहेत. अर्जासोबत आगाऊ रक्कमही भरली  आहे, परंतु अनेक महिने उलटून गेल्यानंतरही यांना वीजजोडणी दिलेली नसल्याने साधारणपणे ४०० पेक्षा जास्त कुटुंबांना अंधारात राहण्याची वेळ आली आहे. तर वीजमीटरच्या तुटवड्यामुळे वीजजोडण्यांना विलंब होत असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

तालुक्याच्या ठिकाणीही आज प्रत्येक घरात टीव्ही, फ्रीज, फॅन अशा विजेवर चालणाऱ्या वस्तू आहेत, परंतु अद्यापही या घरात वीज पोहोचलेली नाही. त्यामुळे घरात असणारी ही उपकरणे धूळखात पडली आहेत. नागरिकांना मोबाइल चार्ज करण्यासाठीही ज्यांच्या घरी वीजजोडणी आहे अशा शेजारच्यांची मदत घ्यावी लागते. एकीकडे घरगुती वस्तू ते अगदी विजेवर चालणारी वाहनेही बाजारात आली आहेत. मात्र दुसरीकडे विक्रमगडसारख्या आदिवासी ग्रामीण भागात वीज मीटर मिळवण्यासाठी नागरिकांना महावितरणचे उंबरे झिजवावे लागत आहेत. दररोज महावितरणकडे वीजजोडणीसाठी नवीन अर्ज येत आहेत. परंतु त्यांना जोडणी मिळत नाही. त्यामुळे शेकडो कुटुंबांना विनाकारण त्रास तर होतोच, पण त्या घरातील विद्यार्थी, नोकरदारांचे या कोरोनाच्या काळात नुकसानही झाले आहे.

 आम्ही वीजजोडणीसाठी पैसे भरले आहेत. तीन महिने झाले तरी अजून वीज मीटर मिळालेले नाही. आम्ही बऱ्याचदा महावितरणच्या कार्यालयात फेऱ्या मारून विनंती केली. लवकरच मीटर येतील असे सांगितले जात आहे. - भूषण महाले, नागरिक

नागरिकांच्या मागणीनुसार वीजजोडण्या चालू आहेत. परंतु मीटरचा तुटवडा असल्याने वीजजोडणी देताना अडचणी येत आहेत. तरी मार्च अखेरपर्यंत सर्व अर्जदारांना  वीजजोडणी देण्यात येईल. - महेश नागो, कार्यकारी अभियंता, महावितरण कार्यालय, विक्रमगड