शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

Video - गिधाडाच्या पिल्लाने पुन्हा घेतली आकाशात भरारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 16:59 IST

सिस्केप संस्था, चिरगाव ग्रामस्थ आणि म्हसळा वनखाते विभागाने पुन्हा एकदा अशक्त झालेल्या गिधाडास सक्षम करून चिरगावच्या आकाशात झेप घेण्याची संधी दिली.

जयंत धुळप/अलिबाग 

सिस्केप संस्था, चिरगाव ग्रामस्थ आणि म्हसळा वनखाते विभागाने पुन्हा एकदा अशक्त झालेल्या गिधाडास सक्षम करून चिरगावच्या आकाशात झेप घेण्याची संधी दिली. एक महिन्यापूर्वी चिरगावच्या गिधाड वसाहतीतील एका घरट्यातून पडलेले गिधाडाचे पिल्लू चिरगाव बागेची वाडी येथील ग्रामस्थांना आढळले. तत्परतेने या पिल्लास सिस्केप व वनखात्याला कळवून ग्रामस्थांनी जीवदान दिल्याने गिधाड संवर्धन चळवळीतील सर्वच घटक किती सतर्क आहेत याची पुन्हा एकदा खात्री पटू लागली आहे.

गिधाडांची जगातील घटती संख्या एकूणच पर्यावरणाला आणि मानवी जीवनाला घातक होत राहिल्याने सिस्केप संस्थेच्या प्रेमसागर मेस्त्री यांनी 19 वर्षापूर्वी सुरू केलेल्या म्हसळा तालुक्यातील चिरगाव येथील गिधाड संवर्धन प्रकल्पामुळे नैसर्गिकरित्या गिधाडांची संख्या जवळजवळ 250 पर्यंत पोहचली आहे. यातही अनेक समस्यांचा परामर्श घेत सिस्केप संस्था हे संवर्धन कार्य पुढे नेत आहे. याकरीता चिरगाव ग्रामस्थ, वनखाते आणि येथील दानशूर नागरीक यामुळे हे संवर्धन सुरू असले तरी समस्या या येतच असतात. त्यातच पिल्लांच्या संगोपनातील अडचणीवर देखील कष्टाने मात करीत सिस्केप संस्थेचा हा गिधाड संवर्धन प्रकल्प सुरू आहे. 

11 फेब्रुवारी 2019 रोजी चिरगाव बागेची वाडी येथील योगेश बारी यांचे घराचे मागील असणाऱ्या झाडाखाली गिधाडांचे पिल्लू पडलेले आढळले. मोहन शिंदे, किशोर घुलघुले, योगेश बारी यांनी तातडीने सिस्केप संस्था व वनखात्यास कळवले. घटनास्थळी प्रेमसागर मेस्त्री, योगेश गुरव व म्हसळा वनखात्याचे पाटील व बनसोडे पोहचल्यावर गिधाडाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या पिल्लाचे तोंडातून दीड मीटर ओढणीचा धागा काढला. तो धागा अन्ननलिकेत अडकल्याने ते गिधाडाचे पिल्लू आठ ते दहा दिवस काहीच अन्न खाऊ शकले नव्हते. या उपासमारीने त्याचे वजनही व फॅटही कमी झाले होते. आठ दिवस त्याला अतिसुरक्षित ठिकाणी बंदिस्त घरात ठेवण्यात आले. गेले महिनाभर त्या पिल्लाचे पाणी आणि चिकनचे मांस देऊन पालनपोषण करण्यात आले. महिन्याभरात त्याला योग्य तो आहार मिळाल्याने त्याचे वजन व त्यातील फॅट वाढल्याचे सिस्केप संस्थेकडून करण्यात आलेल्या नोंदीवरून दिसले. गेले काही दिवस त्याला दोरी बांधून उडण्याचा सराव देखील सिस्केप संस्थेकडून करण्यात आला होता. आज याच पिल्लास चिरगावच्या आकाशात उंच भरारी घेताना चिरगावच्या ग्रामस्थ, शाळकरी मुलांनी आनंद व्यक्त केला. आज सकाळी साडेअकरा वाजता वनखात्याचे रोहा येथील वनअधिकारी गोडबोले, म्हसळा वनक्षेत्र कर्मचारी, भेकराचाकोंड ग्रामस्थ आणि चिरगाव ग्रामस्थांच्या साक्षीने त्या गिधाडाच्या पिल्लाने पुन्हा आपल्या वस्तीकडे जाण्यासाठी महाकाय पंख विस्तारले. यावेळी सिस्केपसंस्थेचे योगेश गुरव, अविनाश घोलप, मिलिंद धारप, सौरभ शेठ, चितन वैष्णव, मित डाखवे, प्रणव कुलकर्णी, ओम शिंदे, चिराग मेहता, अक्षय भावरे, तुषार चव्हाण उपस्थित होते.यावेळी झालेल्या कार्यक्रमात प्रेमसागर मेस्त्री यांनी गिधाड संवर्धनातील ग्रामस्थांचे योगदान पुन्हा एकदा अधोरेखीत केले. या संवर्धनातील येणाऱ्या समस्यांना एकत्रितपणे तोंड देण्यासाठी आपण तत्पर राहण्याविषयी मेस्त्री यांनी पुनरुच्चार केला. यावेळी रोहा वन विभागाचे प्रमुख गोडबोले यांनीही मार्गदर्शन केले.

टॅग्स :alibaugअलिबाग