शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईमुळे भाजीपाल्यांचे दर वाढले, गृहिणींचे बजेट कोलमडले, विवाह खर्च वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 07:03 IST

रायगड जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याबरोबरच सिंचनासाठी लागणाऱ्या पाण्याचीही टंचाई निर्माण झाल्याने भाजीपाल्याचे भाव वाढले आहेत. सध्या लग्न समारंभ मोठ्या प्रमाणात असल्याने भाजीपाल्याची मागणी वाढली आहे

- प्रदीप मोकलवडखळ  - रायगड जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याबरोबरच सिंचनासाठी लागणाऱ्या पाण्याचीही टंचाई निर्माण झाल्याने भाजीपाल्याचे भाव वाढले आहेत. सध्या लग्न समारंभ मोठ्या प्रमाणात असल्याने भाजीपाल्याची मागणी वाढली आहे; परंतु पेण, वडखळ बाजारासह गावोगावच्या आठवडा बाजारात भाजीपाल्याची आवक कमी व मागणी जास्त असल्याने भाव वाढले आहेत, यामुळे गृहिणीचे बजेट कोलमडले आहे तर लग्न समारंभाच्या खर्चात वाढ झाली आहे.सध्या बाजारात वांगी ७० रुपये किलो, भेंडी ६० रुपये किलो, टोमॅटो ५० रुपये किलो, मटार ८० रुपये किलो, मिरची ७० रुपये किलो, गवार ५० रुपये किलो, फरसबी ६० रुपये किलो, कोथिंबीर जुडी ५० रुपये, मेथी जुडी २५ ते ३० रुपये तर फ्लॉवर, कोबी, शिमला मिरची, शेवग्याच्या शेंगा यांचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.रायगड जिल्ह्यातील अनेक गावांत सध्या पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीच्या पाण्याची टंचाई भेडसावत आहे. विहिरी कूपनलिकांची पाण्याची पातळी कमालीची खालावली असून नवीन कूपनलिका खोदताना सुमारे ३०० फुटांपर्यंत पाणी लागत नसल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी खाली गेल्याने येथील स्थानिक भाजीपाल्याचे उत्पादन घटले आहे.पेण, वडखळ बाजारात पुणे, चाकण येथून भाजीपाला विक्रीस येत आहे; परंतु तेथून येणाºया भाजीपाल्याची आवकही मंदावली असल्याने भाजीपाल्याचे दर वाढले आहेत.- विक्रांत पाटील, भाजी विक्रेताबाजारात भाज्याचे दर वाढले असल्याने महिन्याचा खर्च तर वाढलाच आहे तर लग्न समारंभाच्या खर्चात वाढ झाली आहे.- देवेंद्र पाटील, ग्राहक

टॅग्स :vegetableभाज्याwater scarcityपाणी टंचाईInflationमहागाई