शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मनसेची खड्डे मोजा स्पर्धा : वडखळ ते पळस्पे महामार्गावर १५,९१० खड्डे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2019 01:58 IST

मनसेची खड्डे मोजा स्पर्धा : २५ आॅगस्टपर्यत दुरस्ती न केल्यास आंदोलनाचा इशारा

वडखळ/ नागोठणे : मुंबई-गोवा महामार्ग सध्या खड्डेमय झाला आहे. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गोवर्धन पोलसानी यांनी बुधवारी महामार्गाच्या वडखळ ते पळस्पे या मार्गात खड्डे मोजण्याची स्पर्धा आयोजित केल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्रशासन खडबडून जागे झाले आहे. मुंबई-गोवा महामार्गावर वडखळ ते पळस्पेपर्यंत दहा फूट लांब व दहा फूट रुंद अडीच फूट खोल खड्डे पडले आहेत. महामार्गावर १५,९१० खड्डे पडले आसल्याचे गोवर्धन पोलसानी यांनी सांगितले.

यावेळी महाराष्ट नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हासंघटक गोवर्धन पोलसानी, मनसे वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष अभिषेक दर्गे, वाहतूक सेनेचे सरचिटणीस राहुल चव्हाण, विद्यार्थी सेनेचे रायगड जिल्हाध्यक्ष शालोम पेणकर, मनसेचे अलिबाग तालुका अध्यक्ष देवव्रत पाटील आदीसह मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी वडखळ येथे राष्ट्रीय महामार्गचे अभियंता नागराज राव यांनी आंदोलनकांची भेट घेऊन आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ च्या चौपदरीकरणाचे काम संथगतीने सुरू आहे. या महामार्गावर पहिल्याच पावसात सालाबादप्रमाणे छोटे-छोटे, मोठे-मोठे, गोल-गोल, मस्त-मस्त, छान-छान, त्रिकोणी, चौकोनी, काटकोनी आकाराचे खड्डे पडून या मार्गावर प्रवास करणाऱ्यांना हवाई सफर केल्याचा अनुभव येत आहे. तर या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे कित्येक लोकांना प्राण गमवावे लागले आहे. तसेच कित्येकांना कायमचे जायबंदी व्हावे लागले आहे. त्यामुळे आपले, राज्य व केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी वडखळ नाका येथे खड्डे मोजा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई-गोवा महामार्गावर वडखळ ते पळस्पेपर्यंत महामार्गावर १५,९१० खड्डे पडले असल्याचे गोवर्धन पोलसानी यांनी सांगितले. २५ आॅगस्टपर्यंत खड्डे भरले नाहीत तर मनसे स्टाइलने आंदोलन करून संबंधित अधिकाऱ्यांना याच खड्ड्यात बुडविले जाईल, असा इशारा मनसेचे रायगड जिल्हा संघटक गोवर्धन पोलसानी यांनी दिला.मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यामध्ये पेव्हर ब्लॉक बसविले जातील व पाऊस थांबल्यावर डांबरीकरण करण्यात येईल. २५ आॅगस्टपर्यंत सर्व खड्डे भरले जातील.- नागराज राव, अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग 

टॅग्स :Raigadरायगडalibag-acअलीबागMNSमनसे