शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनने आयोजित १९ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत उरण क्रिकेट स्पोर्ट असोसिएशन विजेता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 17:42 IST

रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे घेण्यात आलेल्या १९ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट संघाच्या निवड स्पर्धेत उरण येथील उरण क्रिकेट स्पोर्ट असोसिएशन संघ विजेता ठरला.

मधुकर ठाकूर, उरण :

रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे घेण्यात आलेल्या १९ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट संघाच्या निवड स्पर्धेत उरण येथील उरण क्रिकेट स्पोर्ट असोसिएशन संघ विजेता ठरला. अंतिम सामन्यात त्यानी एसबीसी महाड संघाचा पराभव केला. अत्यंत अटीतटीच्या आणि शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात उरण संघाने महाड संघाचा एका गडी राखून पराभव केला. उरण क्रिकेट असोसिएशनचा खेळाडू दक्ष भगत हा या स्पर्धेत मालिकावीर ठरला.  त्याने संपूर्ण स्पर्धेत २१ बळी घेतले.या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील एकूण १८ संघानी भाग घेतला होता. १ फेब्रुवारीपासून लेदर बॉल वर ४० षटकांची ही लिग पद्धतीची स्पर्धा सूरू होती. रविवारी २ एप्रिल रोजी या स्पर्धेचा अंतिम सामना झाला. अंतिम सामन्यात पियुष वाथ आणि सुरज शिरसाट हे दोघे सामनावीर ठरले. या स्पर्धेचे बक्षिस वितरण रायगड जिल्हा क्रिकेट असोशिएशनचे उपाध्यक्ष प्रकाश पावसकर, किरीट पाटील, रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे निवड समितीचे अध्यक्ष प्रितम कैया आणि कोऑर्डिनेटर सुहास हिरवे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी प्रशांत माने, सुरेश पटेल, सचिन म्हात्रे हे उपस्थित होते.