शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाने शेतकरी पुन्हा संकटात, कडधान्य, आंबापीक धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2020 02:32 IST

Rain In Raigad : शुक्रवारी अचानक हवामानात बदल होऊन संपूर्ण महाड तालुक्यात हलक्या स्वरूपात पावसाने सुरुवात केली. या पावसामुळे पुन्हा एकदा शेतकरी अडचणीत आला आहे.

दासगाव : शुक्रवारी अचानक हवामानात बदल होऊन संपूर्ण महाड तालुक्यात हलक्या स्वरूपात पावसाने सुरुवात केली. या पावसामुळे पुन्हा एकदा शेतकरी अडचणीत आला आहे. या पावसाचा फटका कडधान्य आणि आंबा पिकाला बसणार आहे. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.परतीच्या पावसाने महाड तालुक्यातील बहुतेक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. भातपीक नष्ट झाले, शेतकरी फार खचून गेला असताना, कडधान्याचे कोठार समजले जाणाऱ्या महाड तालुक्यामध्ये परतीच्या पावसाचे पाणी शेतामध्ये साचून राहिले होते. त्यामुळे कडधान्य मूग, मटकी, पावटा, वाल, हरभरा याची पेरणी उशिरा झाली. मात्र, या पावसामुळे या कडधान्याच्या शेतीला बाधा येणार असल्याचे शेतकरी वर्गाकडून बोलले जात आहे. त्याचबरोबर, काही दिवसांपासून महाड तालुक्यात थंडीने डोके वर काढले असल्याने आंब्याच्या झाडाला मोहर येण्यास सुरुवात झाली होती. या पावसामुळे हा मोहर गळून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे पुन्हा एकदा शेतकरी संकटात सापडला आहे.पनवेलमध्ये शहरातील रस्ते ओलेचिंब झाले होते. हिवाळ्याला सुरुवात झाली असली तरी अद्याप गुलाबी थंडीची चाहूल लागलेली दिसत नसताना पहाटे सुरू झालेल्या अवकाळी पावसाने आश्चर्य व्यक्त करण्यात आले. सकाळी कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी पावसात भिजणे टाळण्यासाठी छत्र्यांचा वापर केल्याचे या वेळी दिसून आले.  बोर्ली-मांडला येथे जनजीवन विस्कळीतबोर्ली-मांडला : गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणानंतर शुक्रवारी पहाटेपासून पडलेल्या अवकाळी पावसामुळे मुरूडसह नांदगाव-मजगांव, बोर्ली-मांडला परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले असून, शेतकरी, बागायतदारांच्या चिंतेत वाढ झाली आहे.अचानक हवामात बदल घडून पडलेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या भाताच्या उडव्या, पेंढा भिजल्याने, तसेच शेतात नुकतेच पेरलेल्या वाल, रताळी आदी फळभाजी-पाला व आंब्याच्या पिकावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत असून, येथील शेतकरी व बागायतदारांच्या चिंतेत वाढ झाली आहे. मुरूड तालुक्यात विजेच्या कडकडाटा सह अवकाळी पाऊस आगरदांडा : मुरूड तालुक्यात शुक्रवारी पहाटे चार वाजल्यापासून विजेच्या कडकडासह अवकाळी पाऊस पडल्याने रब्बी हंगमात लावलेल्या पिकांना मोठा धोका पोहोचणार आहे.दिवाळीदरम्यान आणि दिवाळीच्या आधीही कोसळलेल्या पावसाने भातशेतीचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी अधीच हवालदिल झाला आहे. शेतामध्ये कापणी करून ठेवलेली उरले सुरलेले भातपीक पुन्हा पावसाने भिजले. आता पाऊस थांबला असला, तरी ही भिजलेली रोपे आता कुजली आहेत. भात हे मुरूड पंचक्रोशीत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे मुख्य पीक आहे. सुरुवातीला सलग तीन वेळा मुसळधार पावसामुळे भातशेतीचे काही प्रमाणावर नुकसान झाले होते. मात्र, अवकाळी पावसामुळे उरले-सुरले भात पीक व रब्बी हंगमात लावलेले वाल, चवळी, कलिंगड व अन्य पिकांच्या नुकसानीने शेतकरी चिंतेत आहेत.बागायतदारांना ही अवकाळी पावसाचा फटका बसणार आहे. फुल बागायती पिकविणाऱ्या शेतकऱ्यांना फटका बसला आहे. फुले पावसात भिजून गेल्यामुळे त्यांना प्रचंड प्रमाणावर नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. याबाबत कृषी कार्यालयानेही कडधान्य पिकांना धोका पोहोचणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. १५ मिलिमीटर पावसाची नोंदमुरूड तालुक्यात सकाळी ४ पासून ते ९ पर्यंत किमान १५ मिलिमीटर एवढा पाऊस बरसला आहे. त्यामुळे आंब्यासहित कडधान्य पिकालाही धोका पोहोचला आहे. वारंवार अवकाळी पावसामुळे स्थानिक शेतकरी पुरते हैराण झाले आहेत, परंतु अवकाळी पाऊस थांबत नाही. यामुळे दिवसेंदिवस शेतकऱ्याची अवस्था बिकट झाल्याचे निदर्शनास येत आहे.बागायतदारांनाही बसणार फटका कडधान्य घेणारी गावे आंबोली, शिघ्रे, वांदे, उदरगाव, नांदगाव, मजगाव, उसरोली आदी भागांत वाल, सफेद कांदा, चवळी ही पिके मोठ्या प्रमाणात घेतली जतात, परंतु अवकाळी पावसामुळे ही पिके धोक्यात आल्याची  माहिती कृषी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. बागायतदारांना ही अवकाळी पावसाचा फटका  बसणार आहे.

टॅग्स :RainपाऊसRaigadरायगड