शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्येमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट, घर कोसळून ५ जणा्ंचा  मृत्यू, अनेक जण अडकल्याची भीती  
2
ओवेसींच्या सभेतून वारिस पठाण यांचं नितेश राणेंना आव्हान, म्हणाले, ‘दोन पायांवर येशील, पण…’ 
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या गळ्यात शांततेचं नोबेल, नेतन्याहू यांनी शेअर केला असा फोटो, म्हणाले…
4
"सामाजिक विषमता निर्माण करण्याला शरद पवार जबाबदार', मनोज जरांगेंच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखेंचा आरोप 
5
आठव्या क्रमांकाच्या बॅटरनं वाचवलं; पण तोच डाव उलटा फिरला!.. अन् टीम इंडियासमोर आफ्रिकेनं मारली बाजी
6
'हो, ते प्रवासी विमान आम्ही पाडलं होतं', अनेक महिन्यांनंतर व्लादिमीर पुतीन यांची कबुली
7
मनात नसताना रोहित-विराट 'तो' निर्णय घेणार? मोठी माहिती आली समोर
8
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
9
महिलेने रडत रडत केला फोन, पोलिसांना सांगितलं पतीचं गुपित, घराची झडती घेताच बसला धक्का 
10
क्रिकेटच्या मैदानात AI ची ‘बोलंदाजी’! मिताली राजनं पिच रिपोर्टसाठी घेतली गुगल ‘जेमिनी’ची मदत, अन्...
11
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
12
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
13
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
14
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
15
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
16
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
17
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
18
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
19
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
20
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक

रायगडला अवकाळीचा फटका, आंबा, नारळ, काजू बागांचं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2020 01:46 IST

या नुकसानीचे पंचनामे तत्काळ करण्याचे आदेश जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत.

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील महाड, पोलादपूर, रोहा, खालापूर, खोपोली, कर्जत यासह अनेक तालुक्यांत २९ एप्रिलला झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे बऱ्याच ठिकाणी भात, आंबा, काजू, सुपारी बाग आदी पिकांसंबंधी नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे तत्काळ करण्याचे आदेश जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जगात आधीच मोठे संकट उभे राहिले आहे. त्यात बुधवारी रायगड जिल्ह्यातदेखील काही ठिकाणी अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने शेतपिकांवर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. भात, आंबा, काजू, सुपारी आदी पिकांचे नुकसान झाले आहे तर वादळी वाºयामुळे झाडे पडून घरांची पडझड झाली आहे. या सर्वांची नुकसानभरपाई लवकर मिळवून देण्यासाठी तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश आदिती तटकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत.संपूर्ण जगभरात कोरोनाचे संकट आले असून, देशात व राज्यात या महामारीमुळे घोषित के लेल्या लॉकडाउनचा फटका अनेक गरीब मजुरांना, शेतकऱ्यांना बसला आहे. हे कमी की काय, म्हणून बुधवारी रायगड जिल्ह्यात वादळी वाºयासह आलेल्या अवकाळी पावसाने मोठे नुकसान के ले आहे. अनेक ठिकाणी झाडे, विजेचे खांब उन्मळून पडले आहेत. ग्रामीण व काही शहरी भागातील घरांचे पत्रे उडून गेल्याने साठवून ठेवलेल्या अन्नधान्याचे नुकसान झाले आहे. आंबा, नारळ, काजूच्या बागांनाही फटका बसला असून, मुरुडमध्ये आंबा बागेतील झाडे मुळासकट उन्मळून पडली आहेत. दैव बलवत्तर म्हणून सुदैवाने कोणतीही जीवितहानी घडली नाही. मात्र, तातडीने पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी होत आहे.>यांच्या घरांचे झाले नुकसानसावळे गावातील रायगड जिल्हा परिषद शाळेचे छप्पर उडून गेले. तर सावळे गावातील भालचंद्र दळवी, गोपाळ दळवी, संतोष रघुनाथ धुळे, अनंता धुळे, काशीनाथ धुळे, मारुती माळी, अनंता मोडक, दगडू मोडक, मधुकर पोसू धुळे यांच्या घरांचे नुकसान झाले आहे. पाथरज ग्रामपंचायतीमधील मोरेवाडी येथील अंगणवाडी शाळा आणि एक घरकूल यांचे वादळाने नुकसान केले आहे.>पंचनामे तातडीने करा-तहसीलदारांची सूचनाकर्जत तालुक्यात अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे, मंडळ अधिकारी, तलाठी यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पंचनामे करावेत, अशा सूचना तहसीलदार विक्रम देशमुख यांनी दिल्या आहेत. महसूल कर्मचारी, वीज वितरण कंपनी, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम, तालुका कृषी अधिकारी यांनी आपल्या अधिपत्याखाली येणारी कामे, समस्या तातडीने दूर करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत.