शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

दुर्दैवी! पाच किलोमीटरपर्यंत मृतदेह नेला डोलीतून; रस्त्याअभावी चिंभावेवासीयांची फरफट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 13:32 IST

भर पावसात रात्रीच्या वेळी मृतदेह डोलीत ठेवून घरी नेण्याची नामुष्की माने कुटुंबीयांवर आली

लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग: वाडीत जाणारा रस्ताच नसल्याने एकाचा मृतदेह चक्क पाच किलोमीटरपर्यंत डोलीतून न्यावा लागल्याचा प्रकार चिंभावे धनगरवाडीत समोर आला आहे. या घटनेमुळे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. धनगरवाडीतील दीपेश माने याचा ठाण्यातील मानपाडा येथे ९ ऑगस्टला मृत्यू झाला. रुग्णवाहिकेतून त्याचा मृतदेह चिंभावे गावी आणला. मात्र धनगरवाडीतील त्याच्या घरापर्यंत जाणारा रस्ताच शिल्लक राहिलेला नसल्याने रुग्णवाहिका वाडीच्या वेशीवरच थांबवण्यात आली आणि त्यानंतर भर पावसात रात्रीच्या वेळी मृतदेह डोलीत ठेवून घरी नेण्याची नामुष्की माने कुटुंबीयांवर आली.

पावसामुळे हा सगळा रस्ता चिखलमय झालेला असल्याने पाच किलोमीटरपर्यंत वाहनांची ये-जा अशक्य होते. त्यामुळे वाडीत कोणालाही डॉक्टरकडे ने-आण करण्यासाठी डोलीतूनच न्यावे लागते. या परिस्थितीत रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच अनेकांचे प्राण गेल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले.

निधी झाला मंजूर,पण रस्ता कधी?

यापूर्वी महाडचे माजी आमदार शांताराम फिलसे यांच्या काळात वाडीपर्यंत जाणारा रस्ता बांधण्यात आला होता. आता आमदार भरत गोगावले यांनी या रस्त्यासाठी निधी मंजूर केला. पण पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून मंजुरी मिळूनही या रस्त्याचे काम अद्याप सुरूच झालेले नाही. त्यामुळे निधी मंजूर असून रस्ता का होत नाही, असा सवाल धनगरवाडीवासीयांकडून उपस्थित केला आहे.

निवडणुका तोंडावर आल्या की रस्त्याची तात्पुरती मलमपट्टी केली जाते. निवडून आल्यावर रस्ता पक्का करून देतो, असे आश्वासन दिले जाते. परंतु नंतर सर्व जण दुर्लक्ष करतात. स्वतंत्र भारताचा धनगरवाडीही एक भाग आहे, हे लक्षात घेऊन सरकारने रस्ता व इतर सुविधा देऊन आम्हालाही विकासाच्या प्रवाहात आणावे.- नामदेव ढेबे, ग्रामस्थ, धनगरवाडी-चिंभावे

टॅग्स :alibaugअलिबाग