शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

रोहा-कोलाड रस्त्यालगत अनधिकृत मातीचा भराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 01:32 IST

अपघाताची शक्यता : रस्ता रुंदीकरणासाठी अतिक्रमण ठरणार अडथळे

धाटाव : गेल्या कित्येक वर्षांपासून रुंदीकरणाच्या प्रतीक्षेत असलेल्या रोहा-कोलाड रस्त्यालगत धाटावनजीक जैनवाडी येथे मातीच्या भरावाचे अनधिकृत काम सुरू आहे. रहदारीला अडथळा ठरत असलेल्या या मातीच्या भरावामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे, तर रस्त्यालगत अनधिकृत सुरू असलेली बांधकामे थांबवण्यात सार्वजनिक बांधकाम खात्याला पूर्णपणे अपयश आल्याचेही समोर आले आहे. मात्र, यापुढे होणाऱ्या रस्ता रुंदीकरणासाठी ही अतिक्रमणे बांधकाम विभागाला अडथळे निर्माण होऊन कायमची डोकेदुखी होऊन बसणार आहे.

रोहा-कोलाड रस्त्यालगत दोन्ही बाजूने सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांना सध्या अच्छे दिन आले आहेत. रोह्यापासून कोलाडपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुरू असलेली अनधिकृत बांधकामे रहदारीला अडथळा ठरू लागली आहेत. दरम्यान, ११ किलोमीटर अंतराच्या या रोहा-कोलाड रस्त्यावर सध्या नाक्यानाक्यांवर मोठ्या प्रमाणात मातीचा भराव रस्त्यालगत केला जात आहे. या मातीच्या भरावामध्ये मोठमोठे दगड त्याप्रमाणे झाडांच्या मुळ्या असल्यामुळे रस्त्यालगतच टाकलेल्या मातीच्या घरामुळे प्रचंड धूळ उडत आहे; वाहनचालकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. रहदारीला अडचण ठरलेल्या या मातीचा भरावामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. रस्त्यालगतच्या साइडपट्टी नामशेष झाल्या असून, वाहतुकीदरम्यान साइडपट्टींच्या अभावामुळे रहदारीसुद्धा संथगतीने होताना दिसत आहे.रोहा-कोलाड रस्त्यावर दिवसागणिक अपघात होत आहेत; यामुळे रहदारीसाठी एकपदरी असलेल्या रस्त्यामुळे अरुंद रस्ता हाच प्रश्न वारंवार पुढे येत आहे. दरम्यान, सुरू असलेल्या मातीच्या अनधिकृत भरावामुळे अपघातांना निमंत्रण मिळत असून अनधिकृत भराव रोखण्यात सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र अपयशी ठरत आहे.रस्ता रुंदीकरणासाठी हीच अतिक्रमणे अडथळे ठरणार असून वारंवार होत असलेल्या रस्त्यावरील अपघातांना जबाबदार कोण? असा प्रश्न रस्त्यावर वाहनचालकांसह नागरिकांकडून उपस्थित के ला जात आहे.नोटिसा बजावूनही परिस्थिती जैसे थेच्सार्वजनिक बांधकाम खात्याच्या जागेवरती डोळा ठेवून रस्त्यालगत भराव केल्यानंतर मोठमोठे गाळे बांधून हेच गाळे विकण्याचे काम काही महाभाग करताना दिसतात. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून रस्त्यालगतच्या अनधिकृत बांधकामधारकांना वारंवार नोटिसा बजावूनही परिस्थिती मात्र जैसे थेच आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाRaigadरायगड