रोहा-कोलाड रस्त्यालगत अनधिकृत मातीचा भराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 01:31 AM2019-12-26T01:31:45+5:302019-12-26T01:32:00+5:30

अपघाताची शक्यता : रस्ता रुंदीकरणासाठी अतिक्रमण ठरणार अडथळे

Unauthorized soil filling along Roha-Colad road | रोहा-कोलाड रस्त्यालगत अनधिकृत मातीचा भराव

रोहा-कोलाड रस्त्यालगत अनधिकृत मातीचा भराव

Next

धाटाव : गेल्या कित्येक वर्षांपासून रुंदीकरणाच्या प्रतीक्षेत असलेल्या रोहा-कोलाड रस्त्यालगत धाटावनजीक जैनवाडी येथे मातीच्या भरावाचे अनधिकृत काम सुरू आहे. रहदारीला अडथळा ठरत असलेल्या या मातीच्या भरावामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे, तर रस्त्यालगत अनधिकृत सुरू असलेली बांधकामे थांबवण्यात सार्वजनिक बांधकाम खात्याला पूर्णपणे अपयश आल्याचेही समोर आले आहे. मात्र, यापुढे होणाऱ्या रस्ता रुंदीकरणासाठी ही अतिक्रमणे बांधकाम विभागाला अडथळे निर्माण होऊन कायमची डोकेदुखी होऊन बसणार आहे.

रोहा-कोलाड रस्त्यालगत दोन्ही बाजूने सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांना सध्या अच्छे दिन आले आहेत. रोह्यापासून कोलाडपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुरू असलेली अनधिकृत बांधकामे रहदारीला अडथळा ठरू लागली आहेत. दरम्यान, ११ किलोमीटर अंतराच्या या रोहा-कोलाड रस्त्यावर सध्या नाक्यानाक्यांवर मोठ्या प्रमाणात मातीचा भराव रस्त्यालगत केला जात आहे. या मातीच्या भरावामध्ये मोठमोठे दगड त्याप्रमाणे झाडांच्या मुळ्या असल्यामुळे रस्त्यालगतच टाकलेल्या मातीच्या घरामुळे प्रचंड धूळ उडत आहे; वाहनचालकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. रहदारीला अडचण ठरलेल्या या मातीचा भरावामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. रस्त्यालगतच्या साइडपट्टी नामशेष झाल्या असून, वाहतुकीदरम्यान साइडपट्टींच्या अभावामुळे रहदारीसुद्धा संथगतीने होताना दिसत आहे.
रोहा-कोलाड रस्त्यावर दिवसागणिक अपघात होत आहेत; यामुळे रहदारीसाठी एकपदरी असलेल्या रस्त्यामुळे अरुंद रस्ता हाच प्रश्न वारंवार पुढे येत आहे. दरम्यान, सुरू असलेल्या मातीच्या अनधिकृत भरावामुळे अपघातांना निमंत्रण मिळत असून अनधिकृत भराव रोखण्यात सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र अपयशी ठरत आहे.
रस्ता रुंदीकरणासाठी हीच अतिक्रमणे अडथळे ठरणार असून वारंवार होत असलेल्या रस्त्यावरील अपघातांना जबाबदार कोण? असा प्रश्न रस्त्यावर वाहनचालकांसह नागरिकांकडून उपस्थित के ला जात आहे.

नोटिसा बजावूनही परिस्थिती जैसे थे
च्सार्वजनिक बांधकाम खात्याच्या जागेवरती डोळा ठेवून रस्त्यालगत भराव केल्यानंतर मोठमोठे गाळे बांधून हेच गाळे विकण्याचे काम काही महाभाग करताना दिसतात. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून रस्त्यालगतच्या अनधिकृत बांधकामधारकांना वारंवार नोटिसा बजावूनही परिस्थिती मात्र जैसे थेच आहे.

Web Title: Unauthorized soil filling along Roha-Colad road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.