शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
4
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
5
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
6
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
7
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
8
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
9
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
10
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
11
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
12
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
13
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
14
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
15
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
16
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
17
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
18
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
19
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
20
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही

कोकणात ‘बारसू’वरून रणकंदन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2023 05:24 IST

उद्धव ठाकरेंकडून समर्थकांचा समाचार, राज ठाकरे यांनी टोचले कोकणवासीयांचे कान

महाड (रायगड) :  ऐतिहासिक महाड क्रांतिभूमीत शनिवारी झालेल्या सभेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्ष सोडून गेलेल्यांचा समाचार घेत देशाला दिशा देणारा महाराष्ट्र वाचवला पाहिजे. देशाला हुकूमशाही विचारातून वाचवले पाहिजे. यासाठी भाजपला तडीपार करा, असे आवाहन केले. कोकण उद्ध्वस्त होत असेल तर बारसूसारखा प्रयोग होऊ देणार नाही, याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.

“बजरंग दल ही देशभक्तांची संघटना, बंदी घालून काँग्रेसचा मतं मिळवण्याचा प्रयत्न”

चांदे क्रीडांगणावर झालेल्या सभेत व्यासपीठावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना नेते सुभाष देसाई, खासदार चंद्रकांत खैरे, खासदार अरविंद सावंत आदी उपस्थित होते.  उद्धव यांनी गद्दारांचे डिपॉझिट जप्त केल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा निर्धार बोलून दाखवत आधी कोकणच्या माणसांची चाचणी करा, मग मातीची चाचणी करा. ऐकले नाही तर बारसूमध्ये महाराष्ट्र उतरवू, असा इशारा त्यांनी दिला.

फटाके थांबता थांबेनात

भाषण सुरू झाले आणि लावलेले फटाके थांबता थांबेनात. अखेर ठाकरे यांनी भाषण थांबवून ‘अरे, जरा पाणी ओता’ असे म्हणत ‘आधी विजय, मगच फटाके वाजवू’, असे सांगितले. शिवसैनिक पेटले की ऐकत नाहीत. मैदानात वाजणारे फटाके उद्या त्यांच्या बुडाखाली वाजतील, असा टोला हाणला.

महाडचे माजी आमदार दिवंगत माणिकराव जगताप यांच्या कन्या स्नेहल जगताप, पुत्र श्रेयस जगताप आणि बंधू हनुमंत जगताप यांच्यासह महाड तालुक्यातील शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.

तुमच्या जमिनींचा होतोय व्यापार, जागे राहा...

तुमचे लोकप्रतिनिधी व्यापारी आहेत. कोकणात कोणत्या भागात प्रकल्प येणार आहे, हे त्यांना माहिती असते. ते कवडीमोलाने तुमच्या जमिनी घेतात आणि हजारपट दराने विकतात. तुम्हाला कळतच नाही का? अशा कोणालाही जमिनी विकू नका, जागे राहा, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोकणवासीयांचे कान टोचले.

शनिवारी रत्नागिरीतील जाहीर सभेत राज यांनी कोकण विकासाच्या मुद्द्यावरून सध्याच्या आणि आधीच्या सरकारवर ताशेरे ओढले. याआधी एन्रॉन, अणुऊर्जा यांसारखे प्रकल्प येण्याआधीच कोकणी लोकांनी व्यापाऱ्यांना आपल्या जागा विकल्या. आता नाणार, बारसूबाबतही तेच होत आहे. जमिनी पायांखालून जात आहेत, तरीही कोकणी माणसाला कळत कसे नाही, असा प्रश्न करून ते म्हणाले, की नाणारमध्ये होणारा प्रकल्प अचानक बारसूत कसा गेला? कुठून आले हे नाव? असे प्रश्न त्यांनी केले.

पक्ष नसलेल्या पक्षाचे अध्यक्ष कोण

पक्ष नसलेल्या पक्षाचे अध्यक्ष आज येऊन गेले, असा टोला उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता राज यांनी लगावला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकाला मी विरोध करत असल्याचे शरद पवार यांनी पसरवले. मात्र या पवार यांनी आजपर्यंत एकदाही आपल्या भाषणात शिवछत्रपतींचे नाव घेतलेले नाही. आपला विरोध शिवछत्रपतींच्या स्मारकाला असूच शकत नाही, असेही राज म्हणाले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरेShiv Senaशिवसेना