शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ११ वाजेपर्यंत कुठे किती झाले मतदान?
2
Video - तरुणाने 8 वेळा केलं मतदान, पोलिंग पार्टी सस्पेंड; राहुल गांधींनी व्यक्त केला संताप
3
ऑनलाईनही पैशांचं वाटप होतंय; उद्धव ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांचा गंभीर आरोप
4
...म्हणून शरद पवारांनी अचानक यू टर्न घेतला; मुख्यमंत्रिपदाची डील? आणखी एक नवा दावा
5
महाराष्ट्राच्या संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही; संजय राऊतांची जळजळीत टीका
6
ख्रिस गेल पुढच्या IPL मध्ये पुन्हा खेळताना दिसणार? विराटच्या VIDEO नंतर चर्चांना उधाण
7
हेलिकॉप्टर अपघातात इराणचे राष्ट्रपती रईसी यांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्र्यांसह राज्यपालांनीही गमावला जीव
8
'मुलाला सांभाळता येत नाही'; नेटकऱ्यांच्या कमेंट्स जिव्हारी लागल्या, 'त्या' बाळाच्या आईने स्वतःला संपवलं
9
गौरव मोरे ते स्पृहा जोशी; मराठमोळ्या या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
10
PM Modi Share Market : ४ जूननंतर शेअर बाजार नव्या शिखरावर असेल, PM मोदींनी गुंतवणूकदारांना दिला अनोखा सल्ला
11
उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा
12
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
13
'ही मॅन'नेही बजावला मतदानाचा हक्क, ८८ वर्षीय धर्मेंद्र पोहोचले मतदान केंद्रावर; Video व्हायरल
14
नंदुरबारचा रहिवासी.. गुजरातमध्ये GST अधिकारी, साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; कुणीच केला नाही तपास
15
Som Pradosh 2024: नशिबाची साथ मिळत नसेल तर आज सोम प्रदोष व्रत करा,भाग्य बदलेल; वाचा व्रतविधी!
16
Nrusinha Jayanti 2024: २१ मे नृसिंह जयंती: भगवान विष्णुंच्या नृसिंह अवतारामागे दडलेले रहस्य जाणून घ्या!
17
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
18
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
19
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
20
ऐश्वर्याच्या हाताची होणार सर्जरी? फ्रॅक्चर असूनही Cannes फिल्म फेस्टिव्हलमध्ये झालेली सहभागी 

अलिबाग समुद्रात दोन पर्यटक बुडाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 5:03 AM

भरतीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने सौरभ खान (२३) आणि ऋषभ सिव्हा (२४) हे दोघे पर्यटक समुद्रात बुडून बेपत्ता झाले.

रायगड : भरती सुरू झालेली असताना, अलिबाग समुद्रातील कुलाबा किल्ला पाहून किना-याकडे परत येताना, भरतीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने सौरभ खान (२३) आणि ऋषभ सिव्हा (२४) हे दोघे पर्यटक समुद्रात बुडून बेपत्ता झाले. मंगळवारी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली असल्याची माहिती अलिबागचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी दिली.अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी तत्काळ समुद्रकिनारी पोहोचून, बुडालेल्या पयर्टकांच्या शोधाकरिता अलिबाग कोळी बांधवांच्या सहकार्याने बोटी उपलब्ध करून दिल्या; परंतु या शोधकार्यास यश आले नाही. भरतीच्या प्रवाहाबरोबर हे दोघेही रेवदंडा समुद्रकिनाºयाकडे वाहत गेले असावेत, असा अंदाज जाणकार कोळीबांधवांनी व्यक्त केला आहे. अलिबाग उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रेय निघोट, अलिबाग तहसीलदार प्रकाश संकपाळ यांनी समुद्रकिनारी पोहोचून शोधकार्याकरिता नियोजन केले.रसायनीमधील डेकोर होम कंपनीमध्ये सिव्हिल इंजिनीअर म्हणून कार्यरत असलेले एकूण पाच मित्र अलिबाग समुद्रकिनारी मंगळवारी पर्यटनार्थ आले होते. त्यापैकी तिघांनी अलिबाग समुद्रातील कुलाबा किल्ला पाहण्यास जाण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी समुद्रास पूर्णपणे ओहोटी होती. परत येताना भरतीचे पाणी भरू लागले. त्यांनी त्याच भरतीच्या पाण्यातून किनाºयाकडे येण्यास प्रारंभ केला.मात्र भरतीच्या पाण्याच्या प्रवाहाच्या वेगाचा अंदाज न आल्याने सौरभ खान आणि ऋ षभ सिव्हा हे दोघे प्रवाहात वाहत जाऊन समुद्रात बेपत्ता झाले. त्यांचा तिसरा सहकारी मित्र सुरेश स्वामी (सध्या रा. रसायनी, मूळ-अक्कलकोट) हा सुदैवाने पोहत समुद्रकिनारी पोहोचला. त्याने आपल्या अन्य दोघा मित्रांचा किनाºयावर प्रथम शोध घेतला. त्यानंतर त्यांनी अलिबाग पोलिसांशी संपर्क साधल्यावर, तत्काळ ही शोधमोहीम सुरू करण्यात आली.>स्थानिकांच्या सूचनेकडे पर्यटकांचे दुर्लक्षअलिबागच्या समुद्रात दोघे पर्यटक बुडाले असताना, त्यांना शोधण्याकरिता शोधमोहीम सुरू असताना, याच किनाºयावरील भरतीच्या पाण्यात किमान २०० पर्यटक पाण्यात पोहत आणि डुंबत होते. सुरक्षेच्या कारणास्तव पाण्यात जाऊ नका, असे स्थानिक नागरिकांनी यापैकी काही जणांना सांगितले. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून पर्यटक समुद्रात डुंबतच होते.