शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
4
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
5
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
6
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
7
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
8
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
9
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
10
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
11
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
12
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
13
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
14
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
15
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
16
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
17
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
18
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
19
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
20
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट

पोलादपूरजवळ बसला कंटेनरची धडक, दोन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 03:12 IST

मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूर हद्दीत पार्लेवाडी येथे शुक्रवारी सकाळी कंटेनर व एसटी बसची जोरदार ठोकर झाली. या अपघातात दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत.

पोलादपूर - मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूर हद्दीत पार्लेवाडी येथे शुक्रवारी सकाळी कंटेनर व एसटी बसची जोरदार ठोकर झाली. या अपघातात दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची महाड आगाराची बस (एमएच १४ बीटी २५९८) पोलादपूरकडून महाडकडे जात असताना सकाळी सव्वादहाच्या सुमारास खेड बाजूकडे भरघाव वेगाने मार्गस्थ होणाऱ्या कंटेनरचालकाने (एमएच ४६ बीबी ४७२९) रस्त्याच्या परिस्थिती व समोरून येणाºया एसटीकडे दुर्लक्ष केले. यामुळे कंटेनरची बसला जोरदार ठोकर बसली. या अपघातात बसमधील चालक नारायण सुतार व सहायक बारटक्के हे किरकोळ जखमी झाले. त्यांना तातडीने ग्रामीण रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे.महाड आगाराची एक बस ब्रेक डाऊन झाली असता पोलादपूरला दुसरी बस देण्यासाठी व नादुरु स्त बस दुरु स्त करून परत आणण्यासाठी नारायण सुतार व बारटक्के हे गेले होते. ते परत येत असताना पार्ले गावाजवळ कंटेनरची ठोकर बसली. यात सुतार यांच्या हाताला व पायाला मार लागला आहे तर मदतनीस बारटक्के यांच्या पायाला मार लागला असून ग्रामीण रु ग्णालयात उपचार करून त्यांना सोडण्यात आले. बस नादुरु स्त असल्याने यात प्रवासी नव्हते, त्यामुळे मोठी जीवितहानी होण्याची शक्यता टळली. अपघातानंतर महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलादपूर पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली असून कंटेनर चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.कोलाडजवळ अपघातात पादचाºयाचा मृत्यूरोहा : मोठमोठे खड्डे, चुकीचे दिशादर्शक फलक, अतिवेगामुळे मुंबई-गोवा महामार्ग दिवसेंदिवस आणखीनच धोकादायक ठरत आहे. कोलाड तळवली (वाण्याची) येथील बळीराम चंदर पवार यांचा अपघातात सोमवारी रात्री मृत्यू झाला.कोलाड वाण्याची तळवली येथील बळीराम चंदर पवार (४५) व लक्ष्मण अंकुश जाधव (४0) हे मुंबई-गोवा महामार्गावरील तळवली हद्दीतून सोमवारी रात्री पायी जात होते. यावेळी अज्ञात वाहनाने दोघांना जोरदार धडक दिली. या अपघातात बळीराम पवार यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक पसार झाला असून कोलाड पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :AccidentअपघातRaigadरायगड