खोपोली : शिंदेसेनेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी रवींद्र देवकर व त्यांचा मुलगा दर्शन देवकर यांना अटक केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी काळोखे कुटुंबाची भेट घेतली.आरोपींच्या अटकेसाठी शुक्रवारी दिवसभर दोन ते तीन हजार जणांनी पोलिस ठाण्यात ठिय्या धरला होता. मंत्री भरत गोगावले, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेंद्र थोरवे यांनीही पोलिस ठाण्यात जाऊन सर्व आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली. त्यानंतर मध्यरात्री मंगेश यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.मंगेश हत्येचे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी आणि दोषींना कठोर शिक्षा मिळावी यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
सर्व आरोपींना अटक करा : आमदार थोरवेराष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे व रवींद्र देवकर यांनी संगनमताने काळोखे यांच्या खुनाचा कट रचल्याचा आरोप आमदार महेंद्र थोरवे यांनी केला आहे. एफआयआरमध्ये नावे असलेल्या सर्व आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
स्वतंत्र एसआयटी नेमा : सुनील तटकरेमंगेश यांची झालेली हत्या ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे. मुख्यमंत्र्यांनी एसआयटी स्थापन करून याची सखोल चौकशी करावी. पोलिसांनी सर्व यंत्रणा वापरून योग्य तो तपास करावा. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांचा या प्रकरणाशी दुरान्वयेही संबंध नसेल, असा ठाम विश्वास असल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले.
Web Summary : Two key accused were arrested in the Mangesh Kalokhe murder case. CM Shinde assured the family of a fast-track trial and strict punishment for the guilty. An SIT probe is requested. All named in FIR must be arrested.
Web Summary : मंगेश कालेखे हत्याकांड में दो मुख्य आरोपियों को गिरफ्तार किया गया। मुख्यमंत्री शिंदे ने परिवार को फास्ट-ट्रैक मुकदमे और दोषियों को कड़ी सजा का आश्वासन दिया। एसआईटी जांच का अनुरोध किया गया है। एफआईआर में नामित सभी को गिरफ्तार किया जाना चाहिए।