शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघे ठार, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील दुर्घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 01:57 IST

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू झाला आहे. दोन्हीही अपघातांची नोंद पोलीस ठाण्यात झाली आहे.

खोपोली/वावोशी : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू झाला आहे. दोन्हीही अपघातांची नोंद पोलीस ठाण्यात झाली आहे.बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या किलोमीटर २७ या स्पॉटवर, एमएच ०४ डीवाय ७६४९ ही स्पार्क मेकची कार अत्यंत वेगाने रस्त्याच्या मधोमध असलेल्या गार्डनमध्ये घुसली आणि सुरक्षेसाठी लावलेल्या बॅरियर्समध्ये अडकली.तो वेग आणि बसलेला धक्का एवढा जबरदस्त होता की, त्यातील चालक दत्तात्रय सखाराम तावरे (८०, रा. ठाणे पश्चिम) यांचा जागीच मृत्यू झाला.या अपघातात आयआरबी पेट्रोलिंग, महामार्ग पोलीस, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी मदत केली. खालापूर पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली असून, मृत व्यक्तीचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला आहे. या अपघाताची चौकशी खालापूरचे पोलीस निरीक्षक जमील शेख हे करीत आहेत.दुसरा अपघात मंगळवारी घडला. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मंगळवारी रात्री ११.३० वाजता हॉटेल फूडमॉलजवळ, पुण्याकडील बाजूस रस्त्याच्या मधोमध एका व्यक्तीचा अपघात झाल्याची माहिती खोपोली पोलीस ठाण्यात मिळताच, पोलीस निरीक्षक राजन जगताप यांनी आपल्या टीमसह तेथे धाव घेतली. मिळालेल्या माहितीनुसार मृत व्यक्ती वेडसर असून, तिला महामार्गावर अज्ञात वाहनाने धडक दिली व मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. या अपघाताची बेवारस व्यक्तीचा ‘अज्ञात वाहनाच्या धडकेतून मृत्यू’ अशी खोपोली पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. या घटनेत अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी मोलाची मदत केली.

टॅग्स :Accidentअपघात