शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

रायगडमधून दोन अनंत गीते अन् 2 सुनिल तटकरे निवडणूक लढविणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 05:31 IST

नामसाधर्म्याची परंपरा कायम : मते बाद करण्यासाठी एकसारखे नाव असलेला उमेदवार देण्याची शक्कल

अलिबाग : अधिकृत उमेदवारांची मते बाद करण्याकरिता एकसारखे नाव असलेला उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविण्याची रायगड लोकसभा मतदारसंघाची परंपरा यंदाही कायम राहिली आहे. रायगड लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप युतीचे अधिकृत उमेदवार केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्याशी नामसाधर्म्य असणारे अनंत पद्मा गीते यांनी मंगळवारी अपक्ष उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे दाखल केला आहे.

अपक्ष उमेदवार अनंत पद्मा गीते यांच्याबरोबरच मंगळवारी बहुजन समाज पार्टीचे मिलिंद भागुराम साळवी (२ अर्ज), अखिल भारत हिंदू महासभाचे मधुकर महादेव खामकर, बहुजन महापार्टीचे संदीप पांडुरंग पार्टे अशा एकूण चार उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.उमेदवारी अर्ज दाखल करण्यास गेल्या २८ मार्च रोजी प्रारंभ झाल्यापासून मंगळवारपर्यंत नामनिर्देशनपत्रे भरलेल्या उमेदवारांची संख्या १२ झाली आहे.तटकरेही ‘डबल’नामसाधर्म्याचे अनंत गीते मंगळवारी निवडणूक रिंगणात आल्यावर, बुधवारी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-शेकाप आघाडीचे अधिकृत उमेदवार सुनील तटकरे यांच्या नामसाधर्म्याचे सुनील सखाराम तटकरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची माहिती खात्रीशीर सूत्रांनी दिली आहे.

टॅग्स :Anant Geeteअनंत गीतेraigad-pcरायगडLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक