शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

अडीच वर्षांच्या चिमुरडीने सर केला कलावंतीण गड; व्यसनमुक्ती, स्वच्छतेचा दिला संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 00:40 IST

कर्जत-माथेरान दरम्यान प्रबळगड किल्ला आहे.

अलिबाग : तालुक्यातील लोणारे गावातील अडीच वर्षाच्या शर्विका म्हात्रे हिने कर्जत-माथेरानमधील किल्ले प्रबळगडचा अवघड असा कलावंतीणीचा सुळका प्रजासत्ताक दिनी सर केला. शर्विकाने गडावर तिरंगा आणि भगवा ध्वज फडकावला. तसेच गडावर स्वच्छता आणि व्यसनमुक्तीचे फलक झळकावत समाजाला एक उत्तम असा संदेश दिला. आईवडिलांच्या सोबत शर्विकाने हा सुळका सर केला आहे. शर्विकाने अवघ्या अर्ध्या तासात सुळका चढून सर केल्याने तिचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. यापूर्वी शर्विकाने ११ किल्ले सर केले आहेत.कर्जत-माथेरान दरम्यान प्रबळगड किल्ला आहे. तो चढण्यासाठी साधारण तीन तासांचा अवधी लागतो. तेथून कलावंतीण सुळका चढण्यासाठी १५ ते २० मिनिटे लागतात. कलावंतीण गड चढाईसाठी अत्यंत कठीण मानला जातो. आजूबाजूला कशाचाही आधार नसलेल्या दगडात कोरलेल्या पायऱ्यावरून हा सुळका थेट आभाळात भिडल्याचे जाणवते. त्याच्या बाजूला खोल दरी आहे. शर्विकाची प्रबळ इच्छाशक्ती असल्यामुळे, तिने सागरगड, प्रतापगड, खांदेरी, कुलाबा, रायगड, कोर्लई, रेवदंडा, मुरु ड-जंजिरा, पद्मदुर्ग, उंदेरी कलावंतीण दुर्ग असे ११ किल्ले - गड सर केले आहेत. शर्विकाच्या धाडसाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.शर्विकाने गड सर करताना शिवरायांवर आधारित ओव्या, पोवाडे, भूपाळ्या म्हणत कलावंतीणीचा सुळका गड सर केला. शर्विकाला आपल्या आईवडिलांकडूनच हा वारसा मिळाला आहे. शर्विकाचे आईवडील शिक्षक असून, सह्याद्री प्रतिष्ठानचे सदस्यही आहेत.गड-किल्ले सर करण्याआधीच पूर्व तयारी तसेच योग्य त्या खबरदारीचे उपाय, नियोजन करण्यात येत असल्याचे शर्विकाचे वडीलजितेन म्हात्रे यांनी सांगितले.

टॅग्स :Raigadरायगड