शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ट्रक-ट्रेलर अपघात; दोन्ही वाहने जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2021 00:16 IST

केमिकलच्या ड्रममुळे स्फोट होऊन उडाला भडका

लोकमत न्यूज नेटवर्कखोपोली : मुंबई -पुणे द्रुतगती मार्गावर किलोमीटर ३७ आडोशी पुलाजवळ मंगळवारी मध्यरात्री १२.२० वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या दिशेने चाललेल्या ट्रेलरचे ब्रेक निकामी झाल्याने ट्रेलर लेन क्रॉस करून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकला धडकला. या धडकेने दोन्ही गाड्यांनी पेट घेतला. ट्रकमध्ये असलेल्या केमिकलच्या ड्रममुळे स्फोट होऊन आग आणखीनच भडकत होती. त्यामुळे द्रुतगती मार्ग बराच काळ बंद ठेवावा लागला होता. सात ते आठ तासानंतर आग आटोक्यात आली.

आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, महामार्ग वाहतूक पोलीस -बोरघाट, डेल्टा फोर्स, लोकमान्य आरोग्य यंत्रणा, अफसकॉन कंपनी यांनी मदत कार्य केले. खोपोली नगरपालिका, उत्तम गॅलव्हा आणि अन्य अग्निशमन यंत्रणेने आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मदतकार्य करणाऱ्या सर्व यंत्रणा जीव धोक्यात घालून घटनास्थळी होत्या. आगीचा उठणारा भडका, स्फोटकासारखे उडणारे ड्रम, धुराचे लोट, पसरलेल्या दुर्गंधीमध्ये सर्वच यंत्रणा मेहनत घेत होत्या. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य या घटनेत मदत करत आहेत. ही घटना खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाली असल्याने पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली अपघाताचा तपास सुरू आहे.

आग एवढी प्रचंड होती की त्यामुळे आजूबाजूच्या गवताला आग लागून त्याचे वणव्यात रूपांतर झाले. आगीमुळे खोपोली शहरातील अनेक भागात जमा झालेल्या धुरामुळे स्वयंपाकाच्या गॅसची फ्लेम लालसर होत असल्याचे अनेक कॉल खोपोली गॅस एजन्सीमध्ये येत असल्याची माहिती गॅस एजन्सीचे मालक उदय साखरे यांनी दिली.

टॅग्स :RaigadरायगडMumbaiमुंबई