शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींना प्रतीक्षा हक्काच्या घरकुलांची 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 01:54 IST

नामदेव मोरे नवी मुंबई : स्मार्ट सिटीतील आदिवासींची महापालिका प्रशासनाकडून उपेक्षा सुरू आहे. अडवली-भूतवलीमधील आदिवासी नागरिकांची घरे पावसामुळे कोसळू लागली आहेत. दोन वर्षांपूर्वी त्यांच्यासाठी घरकूल योजना मंजूर करण्यात आली; पण प्रत्यक्षात एकही घराची निर्मिती होऊ शकलेली नाही. पावसाने घर कोसळल्याने अनेकांचा  संसार उघड्यावर आला असून, पालिका प्रशासन याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत ...

नामदेव मोरे नवी मुंबई : स्मार्ट सिटीतील आदिवासींची महापालिका प्रशासनाकडून उपेक्षा सुरू आहे. अडवली-भूतवलीमधील आदिवासी नागरिकांची घरे पावसामुळे कोसळू लागली आहेत. दोन वर्षांपूर्वी त्यांच्यासाठी घरकूल योजना मंजूर करण्यात आली; पण प्रत्यक्षात एकही घराची निर्मिती होऊ शकलेली नाही. पावसाने घर कोसळल्याने अनेकांचा  संसार उघड्यावर आला असून, पालिका प्रशासन याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. अडवली-भूतवलीमध्ये राहणाºया पांडुरंग लक्ष्मण वरठे हे आदिवासी नागरिक बिगारी कामगार म्हणून काम करत होते. एका वर्षापूर्वी पायाला दगड लागला व गंभीर जखमी झाले. अद्याप पायाची जखम पूर्णपणे बरी झालेली नाही. पत्नी मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे. २२ जुलैला मुसळधार पावसामध्ये पांडुरंग यांचे कुडाच्या भिंती असलेले घर कोसळले. पावसाचे पाणी घरात शिरले. साहित्य भिजून गेले. पूर्ण कुटुंबच रस्त्यावर आले. पाऊस ओसरला असून, जखमी वरठे घरातील पडलेली लाकडे व इतर साहित्य बाजूला काढण्यात व्यस्त आहेत. भिंतीला फाटलेली साडी बांधून त्याचा पाळणा तयार करण्यात आला असून त्यामध्ये लहान मुलांना ठेवून ते घर सावरण्याचे काम करत आहेत. या परिसरामधील २२ आदिवासींची स्थिती त्यांच्यासारखीच आहे. काहींची घरे यापूर्वी कोसळली आहेत. चंद्रकांत चावरे यांचे पडलेले घर त्यांना सावरताच आले नाही. आता त्यांच्या घराच्या जागेवर फक्त कौल व दगडांचे अवशेष बाकी आहेत. या परिसरामधील यशोदा शांताराम म्हसरे या महिलेचे घर ३० जून २०१६मध्ये पडले. गरिबीमुळे  त्यांना घरांचे बांधकाम करता आले नाही. नागरिकांच्या मदतीने त्यांनी पुन्हा कुडाच्या भिंती व छतावर कौले टाकून तात्पुरता आसरा उभा केला आहे.  नवी मुंबईमधील मूळ निवासी असलेल्या आदिवासींना हक्काच्या निवाºयासाठी झगडावे लागत असून, पालिका प्रशासनही त्याकडे दुर्लक्ष करत आहे. महापे व अडवली-भूतवली परिसरामध्ये चंद्रकांत पाटील नगरसेवक असताना, त्यांनी पालिकेकडे पाठपुरावा करून २२ आदिवासींसाठी घरकूल योजना मंजूर करून घेतली आहे. सद्यस्थितीमध्ये रमेश चंद्रकांत डोळे हे नगरसेवक आहेत. दोन वर्षांपासून त्यांनी सातत्याने आदिवासींना घर मिळवून देण्यासाठी पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. सर्वसाधारण सभेमध्ये याविषयी आवाज उठविला आहे. अधिकाºयांना शेकडो वेळा भेटून हा प्रश्न सोडविण्याची विनंती केली आहे. यापूर्वीचे आयुक्त दिनेश वाघमारे, तुकाराम मुंढे यांच्याकडेही पाठपुरावा केला होता. विद्यमान आयुक्त रामास्वामी एन. यांनाही आदिवासींच्या समस्यांविषयी माहिती दिली आहे. पालिकेच्या सभागृहामध्ये याविषयी तळमळीने आवाज उठविला असून, मृत्यूनंतर आदिवासींना घर देणार का? असा प्रश्न उपस्थित केला आहे; पण पालिका प्रशासन आश्वासनाशिवाय काहीही देत नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मृत्यूची वाट पाहत आहात कायअडवली-भूतवलीमधील आदिवासी नागरिक ग्रामपंचायत काळापासून येथे वास्तव्य करत आहेत. मूळ निवासी असलेले आदिवासी झोपडी सारख्या घरात राहत आहेत. आदिवासींच्या घरात अठराविश्व दारिद्र्य असून, गावाच्या परिसरामध्ये मात्र रिलायन्सपासून सर्व मोठ्या उद्योजकांचे औद्योगिक विश्व उभे राहिले आहे. गावाच्या परिसरातील विकासाचा लाभ प्रत्यक्ष आदिवासींना कधी मिळणार की घरे कोसळून मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाला जाग येणार? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. चाबूकस्वार यांनी केले होते सर्वेक्षणअडवली-भूतवली येथील आदिवासी नागरिकांना घरकूल योजना राबविण्यासाठी यापूर्वीचे योजना विभागाचे उपआयुक्त दादासाहेब चाबूकस्वार यांनी सर्वेक्षण केले होते. अचानक भेटी देऊन व स्वत: प्रत्येक आदिवासींच्या घरामध्ये जाऊन ते तिथे राहतात का? या योजनेसाठी पात्र होऊ शकतात का? याची माहिती घेतली होती; परंतु दोन वर्षांमध्ये प्रशासनाने याविषयी प्रत्यक्षात काहीही अंमलबजावणी केलेली नाही.