शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कर्जत तालुक्यातील आदिवासी वाड्या मूलभूत सुविधांपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 23:41 IST

जांभूळवाडी, नवसूचीवाडी, हऱ्याचीवाडी रस्त्यांची दुरवस्था; प्रशासन, लोकप्रतिनिधींचे मात्र दुर्लक्ष; रस्ता नसल्याने रुग्ण, विद्यार्थ्यांचे हाल

- कांता हाबळे नेरळ : कर्जत तालुक्यात खांडस येथील जांभूळवाडी, हºयाचीवाडी, नवसूचीवाडी या आदिवासी वाडीतील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. त्यामुळे गावात वाहन येत नाही. त्यामुळे ग्रामस्थांना डोक्यावर ओझे घेऊन पायपीट करावी लागते. याबाबत आदिवासी बांधवांकडून तीव्र संताप व्यक्त होत असून रस्त्यांना वाली कोण, असा प्रश्न आदिवासी बांधवांना पडला आहे.कर्जतपासून सुमारे तीस किलोमीटर अंतरावर जांभूळवाडी, हºयाचीवाडी, नवसूचीवाडी या आदिवासी वस्ती असलेल्या वाड्या असून कर्जत-मुरबाड राज्य मार्गालगत असलेला कुरुंग, ताडवाडी खांडस या रस्त्याला जोडून या वाड्या पाड्यांना जोडणारे हे अंतर्गत रस्ते आहेत. सुमारे २० वर्षांपूर्वी तत्कालीन आमदार देवेंद्र साटम यांच्या आमदार निधीतून करण्यात आले होते.जिल्हा परिषद अंतर्गत हे रस्ते येत असून, योग्य देखभालीअभावी या रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्यावरील खडी उखडलेली आहे. या रस्त्यावर वाहन चालविताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.‘गाव तेथे एसटी’ असे ब्रीदवाक्य मिरवणारे परिवहन खात्याची बस सेवाही नसल्याने येथील आदिवासींना दळणवळणाची सोय नसल्याने तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी प्रथम त्यांना चार ते पाच किलोमीटर अंतर पायी चालून वारे गाव गाठावे लागते. त्यानंतरच त्यांना उपलब्ध वाहनाच्या साह्याने तालुक्याच्या ठिकाणापर्यंत पोहचता येते.अनेक आदिवासी आपल्या उपजीविकेसाठी शेती, तसेच भाजीपाला लागवड करीत आहेत. मात्र, त्यांनी कष्टाने पिकविलेला भाजीपाला विक्र ीसाठी बाजारपेठेत नेण्याकरिता खराब रस्त्याअभावी व अन्य वाहतुकीची साधने उपलब्ध नसल्याने आदिवासींना बोजा डोक्यावर घेऊन मार्गक्र मण करावे लागते. एखाद्या कुटुंबातील व्यक्ती आजारी झाल्यास किंवा महिला गरोदर असल्यास आरोग्य केंद्रात नेण्याकरिता चादरीची झोळी करून चार ते पाच किलोमीटरचे अंतर पार करावयास लागत असल्याचे चित्र या भागात दिसून येते. तालुक्यातही प्रमुख रस्त्याकडे तर प्रसार माध्यमासहित प्रशासनाचेही लक्ष जाते व तातडीने रस्त्यावरील खड्डे भरून तात्पुरती मलमपट्टी केली जाते. मात्र, या वाड्या पाड्यातील अंतर्गत रस्ते मात्र दुर्लक्षितच होत आहेत. या रस्त्यांना वाली कोण ? हा प्रश्न येथील नागरिकांकडून विचारला जात आहे.निवडणुका आल्या की, येथील आदिवासी बांधवांवर उमेदवारांकडून आश्वासनांची खैरात केली जाते; परंतु निवडणुका झाल्या की या आश्वासनांचा विसर पडतो. त्यामुळे वर्षानुवर्षे आदिवासी बांधव मूलभूत सुविधांपासून वंचित राहतात. विशेष म्हणजे आदिवासी भागात वीज, रस्ते नसल्यानेच येथील तरु ण शिक्षणापासून वंचित राहत असल्याचे दिसून येत आहे.तालुक्यात विविध पक्षाचे नेते मंडळी येणार म्हणून तालुक्यातील महत्त्वाच्या रस्त्यांची डागडुजी केली जाते, यासाठी बांधकाम विभागाची धावपळ सुरू असते. मात्र, २० ते २५ वर्षांपासून या आदिवासी भागातील रस्त्यांवर साधी डागडुजीही होत नाही.आदिवासी भागात गेल्या २० वर्षांपासून रस्ते चांगले झाले नाहीत. रस्त्यावर खडीही राहिलेली नाही अशी अवस्था रस्त्यांची आहे, मोटारसायकल चालवणेही कठीण झाले आहे, त्यामुळे मोठा त्रास आमच्या आदिवासी बांधवांना होत आहे. त्यामुळे शासनाने आमच्याकडे लक्ष देऊन रस्ते तरी चांगल्या दर्जाचे करावेत.- मारु ती पारधी,ग्रामस्थ, जांभूळवाडी

टॅग्स :Raigadरायगड