शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटन व पर्यावरणासाठी महाड तालुक्यात भिवघरच्या आदिवासींचे प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2019 21:59 IST

आपलं जंगल वणवामुक्त झाले असल्याने तेथील जंगलाचा पुरेपूर उपयोग आपल्याला होत असल्याबद्दल भिवघर येथील आदिवासींना पर्यावरणाचे महत्त्व समजले.

- जयंत धुळप

अलिबाग - आपलं जंगल वणवामुक्त झाले असल्याने तेथील जंगलाचा पुरेपूर उपयोग आपल्याला होत असल्याबद्दल भिवघर येथील आदिवासींना पर्यावरणाचे महत्त्व समजले असून त्याकरिता ते मेहनत घ्यायला लागले आहेत. महाड येथील श्रृंखला संस्थेच्या वतीने आणि भिवघर वनमित्र संस्थेच्या सहकार्याने येथील आदिवासी महिला सिडबॉल करण्यात गुंग आहेत. आपलं जंगल वाचविणे आणि वाढविणे हे आपले कर्तव्य आहे याची जाणीव सात वर्षापूर्वी भिवघरच्या ग्रामस्थांना झाली. वनप्रेमी संस्थेच्या वतीने किशोर पवार यांनी आपलं जंगल वणवामुक्त केल्याने गेल्या सात वर्षात या भिवघरच्या जंगलात अनेक वनस्पती वाढत आहेत.घनदाट जंगल व वणवामुक्त झाल्याने येथील वन्यजिवांचा संचार पाहायला मिळतो. जंगलात त्यांच्यासाठी फळांची, फुलांची, कीटकांची व लहान पक्षी व प्राण्यांचा संचार असल्याने प्रत्येकाचे खाद्य प्रत्येक वन्य प्राण्यांना मिळत आहे. या वनसंपदेत रानमेव्याची भर लक्षणीय आहे. इतर ठिकाणी वणव्यामुळे रानमेव्याचे उत्पादनच घटले आहे. परंतु रानमेव्यामुळे आदिवासींना मिळणाऱ्या रोजगारामुळे सध्या भिवघरच्या आदीवासींना वनाच्या संवर्धनाचे उपक्रम समजायला लागले. मिळालेल्या फळांच्या व झाडांच्या बियांचे सिडबाॅल करून ते जंगलात टाकण्यात येणार असल्याची माहिती किशोर पवार यांनी दिली.गेल्या आठवड्यात श्रृंखला या महाडच्या संस्थेच्या ममता मेहता यांनी येथील आदिवासींचे सिडबाॅल तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर आता मोठ्या प्रमाणात सिडबाॅल तयार झाले असून यंदाच्या जून महिन्यात त्याचे रोपण करण्यात  येणार आहे. सध्या भिवघरमध्ये फळांचे व जंगली वनस्पतींच्या बिया माती व शेणाच्या गोळ्यात भरण्याचे काम जोरात सुरू असून, भिवघर ग्रामस्थांच्या या उपक्रमामुळे त्यांचे संपूर्ण तालुक्यात कौतुक होत आहे. वाढत्या जंगलामुळे भिवघर हे गाव पर्यटनासाठी सज्ज झाले आहे. सध्या वणवामुक्त गाव म्हणून संपूर्ण कोकणात महाड तालुक्यातील या भिवघर गावाचे नाव घेतले जाते. वनप्रेमी मंडळाचे अध्यक्ष किशोर पवार यांनी आपल्या गावासारखे गावे कोकणात तयार होण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. फक्त त्या त्या गावातील तरुण मंडळी पुढे आली पाहिजेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.