शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

उरणमध्ये तिरंगी लढत अटळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 23:33 IST

उरण विधानसभा मतदारसंघ : भाजपची बंडखोरी सेनेला तापदायक ठरणार

मधुकर ठाकूर ।लोकमत न्यूज नेटवर्कउरण : उरण (१९०) विधानसभेच्या तिसऱ्या निवडणुकीची तयारी मतदारसंघात सुरू झाली आहे. निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर झाली नसली तरी सर्वच प्रमुख राजकीय पक्ष निवडणूक लढविण्याच्या तयारीला लागले आहेत.२०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत शेकाप, शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आदी प्रमुख राजकीय पक्षांनी स्वबळावर आणि स्वतंत्रपणे निवडणूक लढविली होती. मात्र, २०१९ मध्ये होणाºया विधानसभा निवडणुकीत शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आदी राजकीय पक्षांनी आघाडीत सामील होऊन एकत्रितपणे निवडणूक लढविण्याच्या तयारीला लागले आहेत. तर मागील साडेचार वर्षांत एकमेकांना शिव्याशाप आणि परस्परांच्या विरोधात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत पुन्हा सत्तेसाठी एकत्र आलेल्या सेना-भाजपतील तिढा अद्याप सुटलेला नाही.

युती होणारच आणि युतीच्या जोरावरच आगामी विधानसभेच्या निवडणुका लढविल्या जाणार असल्याचे सेना-भाजप नेत्यांकडून सांगितले जात आहे. मात्र, युतीची अधिकृत घोषणा अद्याप तरी झालेली नाही. त्यामुळे शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे अशा आघाडीतर्फे माजी आमदार विवेक पाटील, सेनेतर्फे विद्यमान आमदार मनोहर भोईर यांची नावे सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. मात्र, भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश बालदी बंडखोरीच्या तयारीत आहेत. तशी घोषणाही बालदींकडून विविध जाहीर कार्यक्रमातून वारंवार केली जाऊ लागली आहे.नव्याने निर्माण झालेल्या उरण विधानसभेच्या दोन निवडणुका पार पडलेल्या आहेत. १९९९ च्या निवडणुकीत शेकापचे विवेक पाटील यांनी काँग्रेसच्या दिवंगत कामगार नेते श्याम म्हात्रे यांना पराभूत करून स्वतंत्र उरण विधानसभेत निवडून येण्याचा मान मिळविला होता. तर २०१४ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत पनवेल-उरण मतदारसंघांतून सलग तीन वेळा आमदार म्हणून प्रतिनिधित्व केलेल्या विवेक पाटील यांना आत्मविश्वास नडला. मतदारसंघातील समस्या सोडविण्यातही विवेक पाटील अपयशी ठरले. त्यामुळे नाराज झालेल्या मतदारांकडून त्यांना पराभवाची चव चाखावी लागली.

रायगड जिल्ह्यात भाजपचे नामोनिशाणही नव्हते. मात्र, रामशेठ ठाकूर यांच्यासह पनवेलचे काँग्रेस आमदार प्रशांत ठाकूर यांनी हजारो समर्थकांसह ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच भाजप प्रवेशामुळे पनवेल-उरणमधील राजकारण चांगलेच ढवळून निघाले. हजारो काँग्रेस कार्यकर्ते भाजपवासी झाल्याने उरण मतदारसंघात काँग्रेसची स्थिती दयनीय झाली. रामशेठ यांच्या भाजप प्रवेशाने उरण मतदारसंघातील काँग्रेसची सुमारे वीस हजार मते भाजपकडे गेली. त्याचा जबरदस्त फटका काँग्रेसचे उमेदवार महेंद्र घरत यांना बसला आणि घरत यांचे विजयाचे स्वप्न भंगले. घरत यांना तिसºया क्रमांकावर समाधान मानावे लागले. तर दुसरीकडे भाजपकडून उमेदवारी मिळालेले महेश बादली यांना रामशेठ यांचा पाठिंबा मिळाल्याने त्यांना मते खेचण्यात यश आले.सेनेचे उरण विधानसभेचे विद्यमान आमदार मनोहर भोईर यांच्या गेल्या पाच वर्षांच्या कारकीर्दीत काही विकासकामे झाली असली तरी ती प्रभावी नसल्याचा सूर आहे. भाजपचे जिल्हा सरचिटणीस आणि जेएनपीटीचे माजी ट्रस्टी महेश बादली यांनी युती होवो अथवा न होवो विधानसभा अपक्ष उमेदवार म्हणून लढविण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मतदारसंघात निवडणूक जाहीर होण्याआधीपासूनच प्रचाराला सुरुवात केली आहे. बालदी यांना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून विविध जाहीर कार्यक्रमातून वारंवार पाठिंबाही दिला जात आहे.

मात्र, प्रत्यक्षात सेना- भाजप युतीची अधिकृतपणे घोषणा करण्यात आल्यानंतर अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याच्या तयारीला लागलेल्या महेश बालदी यांना जाहीरपणे मदत करतील का ? भाजपचे प्रचार प्रमुख आणि प्रामुख्याने रामशेठ ठाकूर यांच्यावरच पनवेल-उरण मतदारसंघातील पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराची भिस्त असताना पक्षशिस्त डावलून अपक्ष उमेदवाराचा प्रचार करतील का? या प्रश्नाबाबत मतदारसंघातील नागरिक, मतदारांना मोठी उत्सुकता आहे. मात्र, यामुळे सेनेचे मनोहर भोईर यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता अधिक आहे.अशा गोष्टी घडल्यास पनवेलमध्ये भाजपलाही सेना अडचणी निर्माण करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.शेकाप, काँग्रेस, राष्टÑवादी व मनसेच्या आघाडीचा फटका२०१९ मध्ये होणाºया विधानसभेच्या निवडणुकीत चित्र पालटले आहे. कारण मागील निवडणूक सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी स्वबळावर लढविल्या होत्या. मात्र, या निवडणुकीत शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे अशी आघाडी झाली आहे. आघाडीतर्फे माजी आमदार विवेक पाटील यांचे नाव जवळपास निश्चित करण्यात आले आहे. आघाडीमुळे मागील विधानसभा निवडणुकीत सेनेकडून ८११ मतांनी झालेल्या पराभवाची परतफेड केली जाऊ शकते. त्यादृष्टीने शेकापने व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. मात्र, विवेक पाटील यांच्या बिघडलेल्या प्रकृतीचा विरोधकांना फायदा होण्याची शक्यता आहे.युतीवर राजकीयगणिते अवलंबूनसेना-भाजप युती झाली तरी अपक्ष म्हणून मिळणाºया कोणत्याही चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचे भाजप नेत्यांच्या समक्षच महेश बालदी यांनी पनवेलमध्ये झालेल्या बुथ कमिट्यांच्या मेळाव्यात जाहीर करून टाकले आहे. त्यामुळे उरण विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत अटळ आहे. त्यामुळे सेना उमेदवारांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.