शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

ट्रान्सफॉर्मरचा खांब धोकादायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 00:11 IST

श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथील शंकर मंदिराजवळील ट्रान्सफॉर्मरचा वीजखांब खालील बाजूने सडला आहे.

दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथील शंकर मंदिराजवळील ट्रान्सफॉर्मरचा वीजखांब खालील बाजूने सडला आहे. जीर्ण वीजखांब भरवस्तीत असल्यामुळे कोणत्याही क्षणी तो कोसळून जीवितहानी होऊ शकते. या गंभीर समस्येकडे महावितरणने लक्ष देत ट्रान्सफॉर्मरचे येथून स्थलांतर करावे, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.बोर्लीपंचतन येथील शंकर मंदिर परिसरात दाट नागरी वस्ती असून, पलीकडे स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी असल्याने शेतीकामासाठी ट्रान्सफॉर्मर असलेल्या रस्त्याने जावे लागते. दरम्यान, वेळोवेळी ट्रान्सफॉर्मरवर होणाºया शॉर्टसर्कि टमुळे ये-जा करणाºयाला व आजूबाजूच्या घरांना ट्रान्सफॉर्मर धोकादायक ठरत आहे. भरवस्तीत घराला खेटूून असणारा गंजलेले खांब केव्हाही तुटून पडेल, हे सांगता येत नाही. त्यामुळे दुर्दैवाने खांब तुटल्यास अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.मंदिराजवळील ट्रान्सफॉर्मरशी जोडले गेलेल्या हजारोंच्या अधिक संख्येत ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो. सडलेला विद्युत खांब केवळ समोरील जोडणीच्या आधारावर लोंबकळत आहे. एकमेकाला लिंक असलेले हे खांब लगतच्या घरांवर कधीही कोसळू शकतो. गेल्या अनेक दिवसांपासून हा खांब जीर्ण अवस्थेत असल्याने ही बाब स्थानिकांच्या जीवावर बेतणारी ठरत आहे. त्यामुळे ट्रान्सफॉर्मर स्टॅड येथून स्थलांतर करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.सद्यस्थितीत बोर्लीपंचतन भागात वीज पुरवठा विषयक अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. यामुळे अनेकदा येथील वीज पुरवठाही खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. तालुक्यात मान्सून पावसाने सुरुवात केली असताना महावितरणने पावसाळी दुर्घटना टाळण्यासाठी कोणतेच प्रयत्न केले नाही, यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.बोर्लीपंंचतन शहरातील जीर्ण वीजखांब बदलण्यात येतील. शंकर मंदिराजवळील ट्रान्सफॉर्मरवर मोठ्या प्रमाणात वीजवाहिनी जोडणी असल्याने क्षमतेनुसार अंदाजे खर्च पत्र (इस्टिमेंट) तयार करून तसा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे दिला आहे.- महेंद्र वाघपैंजन,उपअभियंता, श्रीवर्धन महावितरण.>बोर्लीपंचतन ग्रामपंचायतीतर्फे शंकर मंदिराजवळील ट्रान्सफॉर्मरचा विद्युत खांब लवकरच बदलण्यात यावा, असे मागणी पत्र श्रीवर्धन महावितरण विभागाला दिले असून दुरुस्तीसाठी विलंब होत असल्यास आंदोलन छेडण्यात येईल.- नंदकिशोर भाटकर,ग्रुपग्रामपंचायत सदस्य, बोर्लीपंचतन.