शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

नेते एकत्र मात्र कार्यकर्त्यांची मने दुभंगलेली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 22:56 IST

मतदानावर होणार परिणाम; सरळ लढतीत युती, आघाडीच्या उमेदवारांचा लागणार कस

- मिलिंद अष्टिवकरलोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, रायगड लोकसभा मतदारसंघात यंदा आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे आणि युतीचे उमेदवार अनंत गीते यांच्यात सरळ लढत होणार आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघांचा निकाल पाहता लोकसभा निवडणुकीत आघाडी आणि युतीच्या उमेदवारांची कसोटी असणार आहे. या मतदारसंघातील श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव, तळा आणि रोहा या पाचही तालुक्यांत मागील काळात झालेली राजकीय उलथापालथ युती आघाडीच्या उमेदवारांचा कस लावणारी आहे.आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांचे गाव असलेला रोहा तालुका हा श्रीवर्धन, अलिबाग आणि पेण या तीन विधानसभा मतदारसंघात विभागलेला आहे. यातील दोन मतदारसंघात शेकापचे आमदार आहेत. यंदा शेकाप आघाडीत सहभागी झाला असल्याने तटकरेंना याचा लाभ होणार आहे. निवडणूक आचारसंहिता रविवारी लागू झाली असली, तरी या मतदारसंघात दोन्ही उमेदवारांनी यापूर्वीच प्रचारात आघाडी घेतलेली दिसून येते. सुनील तटकरे यांनी कधी नव्हे ते पंधरवड्यापूर्वीच ‘रायगडचा नेता दिल्लीला पाठवा’ या आशयाचे बॅनर्स सर्वत्र लावून प्रथमच आपला निवडणूक प्रोमो केला. तर अनंत गीते यांनी नुकतेच मतदारसंघात विविध सामाजिक संस्थांना निधी, रु ग्णवाहिका व अन्य मदत वितरणाचे अनेक कार्यक्र म घेतलेले आहेत.गेल्या लोकसभा निवडणुकीत शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी सुनील तटकरे यांच्यावर भष्ट्राचाराचे आरोप केले होते. रोह्यात सभा घेऊन भ्रष्टाचारांचे पुरावे असलेली श्वेतपत्रिका त्यांनी प्रसिद्ध केली होती. या वेळी मात्र शेकाप आघाडीत सहभागी झाले असून, रोह्यात तटकरेंच्या विरोधात भरसभेमध्ये मांडी थोपटणारे आमदार जयंत पाटील आता तटकरेंच्या मांडीला मांडी लावून बसत आहेत. नेते मंडळी मतदारांना गृहीत धरत असल्याची भावना मतदारांत वाढीस लागत असून ही बाब निवडणूक मतदानावर परिणाम करणारी आहे.त्यामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेली खारगाव जिल्हा परिषदेची जागा शेकापने आपल्या ताब्यात घेतल्याने झालेली नाराजी आणि ग्रामपंचायत निवडणुकीत काही ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये झालेली धुसफूस पाहता, वरवर सर्वकाही अलबेल दिसत असले तरी कार्यकर्त्यांची दुभंगलेली मने मात्र मतपेटीतून व्यक्त होणार आहेत.बेरोजगारी हा सर्वात महत्त्वाचा प्रश्नया मतदारसंघात माणगाव तालुक्यात विळे, भागाड आणि रोहा तालुक्यातील धाटाव एमआयडीसीचे मोठे क्षेत्र आहे. ४० हून अधिक रासायनिक कंपन्या येथे आहेत. असे असले तरी या मतदारसंघात तरु णांच्या हाताला काम नाही, बेरोजगारी हा सर्वात महत्त्वाचा भेडसावणारा प्रश्न त्यांच्या पुढे आहे. येथील एमआयडीसीमध्ये कंत्राटी धोरण राबविले जाते. मोठ्या प्रमाणात कायमस्वरूपी रोजगार येथे उपलब्ध असतानाही रोहा माणगाव आणि लगतच्या तालुक्यातील तरु णांना यापासून वंचित राहावे लागत आहे.रासायनिक प्रक्रि येत म्हणजे प्रोसेसिंगमध्ये कंत्राटी नोकरदार घेऊ नयेत, असे शासन निर्देश असतानाही नेत्यांच्या मर्जीने कंत्राटी कामगार धोरण येथे राबविले गेले. त्यामध्ये काही स्थानिक पुढारी ठेकेदार झाले. कंत्राटी कामगार पुरवठा करून ते काही दोन, चार गब्बर बनले असले तरी असंख्य तरु णांचा हक्काचा रोजगार त्यामुळे बुडालेला आहे.धाटाव एमआयडीसीत आज किमान १२ ते १४ हजार कामगार कंत्राटी पद्धतीवर नोकरीत आहेत. त्यांच्या हातांना कायमस्वरूपी काम नाही. अनेक तरु णांचे बायोडेटा नेते मागून घेतात, गोळा करतात आणि तरु णांना केवळ आशेवर ठेवले जाते पुढे कहीच केले जात नाही. तरु णवर्गाला कायमस्वरूपी रोजगार मिळाले तर ते सक्षम होतील. त्यांना नेत्यांची गरज भासणार नाही. झेंडे हातात घेऊन मागे पुढे करणारे कार्यकर्ते मिळणार नाहीत, असे धोरण यामागे असल्याने तरु णांसह पालकवर्गात मोठी नाराजी असून याचा परिणाम मतदानावर होणार आहे.पारंपरिक शत्रुत्वाने मने कलुषितया निवडणुकीत शेकाप आघाडीत सहभागी झाले असले, तरी या मतदारसंघात शेतकरी कामगार पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पारंपरिक राजकीय शत्रू राहिलेला आहे. ग्रामीण भागात हे शत्रुत्व इतके भिनले गेले की याचे पर्यावसन खून, हत्या होण्यापर्यंत झालेले आहे. या दोन्ही पक्षांच्या टोकाच्या राजकीय वादातून रोहा तालुक्यात तळाघर आणि वरोडे पाले या गावांत चार कार्यकर्त्यांच्या खुनांच्या घटना घडलेल्या आहेत.वरील दोन्ही गावांतील एकूण ४० जणांना जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे. राजकारणात नेत्यांवर निष्ठा ठेवणारे हे कार्यकर्ते तरु ंगवासात शिक्षा भोगत आहेत. राजकारणाचे बळी ठरलेल्या सर्वांच्या कुटुंबीयांची झालेली वाताहात झाली असून कधी न भरून येणारे नुकसान या तालुक्यांनी भोगलेले आहे.सत्ता आणि मंत्रिपदाच्या कार्यकाळात राष्ट्रवादीकडून विरोधी पक्षाच्या आणि विशेष करून शेकापच्या कार्यकर्त्यांना दिली गेलेली वागणूक, त्रास या सर्व गोष्टी विसरून दोन्ही पक्षांचे नेते एकत्र आले तरी दुभंगलेली आणि कलुषित झालेली कार्यकर्त्यांची मने एकत्र आणण्याचा मोठा प्रश्न या नेत्यांसमोर आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस