शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

कशेळे येथे चेंगराचेंगरीत तीन महिला जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2019 23:08 IST

बँक आॅफ महाराष्ट्र बंद होण्याची अफवा : पैसे काढण्यासाठी ठेवीदारांची झाली होती गर्दी

कर्जत : काहीच दिवसांपूर्वी पंजाब-महाराष्ट्र को-आॅपरेटिव्ह बँकेत त्यांच्या अर्थिक हिशोबात तफावत आढळल्याने रिझर्व्ह बँकेने त्यांच्यावर काही निर्बंध आणल्यानंतर खातेदार आणि ठेवीदारांनी आपले स्वत:चे पैसे काढण्यासाठी संपूर्ण भारतातील शाखांबाहेर गर्दी केली होती. त्यानंतर अशाच प्रकारे देशातील नऊ बँका बंद होणार असल्याचे मेसेज व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून नागरिकांमध्ये पसरले, बंद होणाऱ्या नऊ बँकांमध्ये बँक आॅफ महाराष्ट्रचेही नाव असल्याने कर्जत तालुक्यातील कशेळे बँक शाखेच्या बाहेर खातेदार आणि ठेवीदारांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. गर्दीमुळे चेंगराचेंगरी होऊन तीन महिला जखमी झाल्या; तर गुलाब जगतापया महिलेच्या हाताचे बोट तुटले आहे. बँक बंद होणार या अफवेने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे.

कर्जत तालुक्यात कशेळे येथे बँक आॅफ महाराष्ट्रांची शाखा मागील ३५ वर्षांपासून अधिक काळ ही बँक येथील ग्रामीण भागातील लोकांना सेवा देत आहे. बँकेचे ३० हजारांहून अधिक खातेदार असून, कशेळे परिसरातील आदिवासी भागातील लोकांना सेवा देणारी एकमेव राष्ट्रीयीकृत बँक आहे. बँक आॅफ महाराष्ट्राच्या कशेळे शाखेबाहेर लोकांनी पैसे काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे.बँक बंद होण्याच्या अफवेने नागरिक मोठ्या प्रमाणात बँकेबाहेर गर्दी करत असल्याने दररोज चेंगराचेंगरीच्या घटना घडत आहेत. आतापर्यंत तीन महिला जखमी झाल्या आहेत. कशेळे शाखेत खातेदार आणि ठेवीदार बहुतांश हे आदिवासी लोकच आहेत.येथील बँक कर्मचारी, ही एक सरकारी बँक असून कधीच बंद होणार नाही, असे वारंवार त्यांना सांगत आहेत; परंतु खातेदार काही मन:स्थितीत नसून, ‘आम्हाला आमचे पैसे द्या’ हेच बोलत आहेत. दररोज हजारो खातेदार आणि ठेवीदार पैसे काढण्यासाठी बँकेत गर्दी करत असल्याने कर्मचारीही त्रासले आहेत. 

पंजाब महाराष्ट्र को-आॅपरेटिव्ह आणि बँक आॅफ महाराष्ट्र यांचा काहीही संबंध नसून, बँक आॅफ महाराष्ट्र ही एक सरकारी बँक आहे, तरी ग्राहकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, बँक महाराष्ट्र ही कधीही बंद होणार नाही.- अल्ताफ हुसैन, मॅनेजर, बँक आॅफ महाराष्ट्र,शाखा कशेळे

टॅग्स :Bank Of Maharashtraबँक ऑफ महाराष्ट्र