शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

उरणमध्ये संरक्षण भिंत घरावर कोसळून आई मुलांसह तीनजण गंभीर जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2022 15:05 IST

करंजा येथील द्रोणागिरी देवी मंदिराच्या पायथ्याशी वसलेल्या सातघर येथील एका जुन्या घरावर पहाटे तीन वाजताच्या सुमारास संरक्षक भिंत कोसळून  आई- मुलांसह दोन जण गंभीर तर एक जण किरकोळ जखमी झाले आहेत.

मधुकर ठाकूर

उरण :

करंजा येथील द्रोणागिरी देवी मंदिराच्या पायथ्याशी वसलेल्या सातघर येथील एका जुन्या घरावर पहाटे तीन वाजताच्या सुमारास संरक्षक भिंत कोसळून  आई- मुलांसह दोन जण गंभीर तर एक जण किरकोळ जखमी झाले आहेत. संगिता पाटील (४५), कुणाल पाटील, (२२) दिपेश पाटील (२०) अशी जखमींची नावे असुन त्यांना उपचारासाठी नवी मुंबईतील डी.वाय.पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.

उरण तालुक्यातील करंजा येथील द्रोणागिरी देवी मंदिराच्या पायथ्याशी सातघर गाव वसलेले आहे. डोंगराच्या उतारावर दाटीवाटीने वसलेल्या सातघरातमहेंद्र पाटील यांचे कुटुंबीय राहात आहेत.पाटील यांच्या घराच्या समोरच उंचावर केशव गावंड यांच्या घराची संरक्षक भिंत आहे.मंगळवारी (१३) पहाटे तीन वाजताच्या सुमारास अतिवृष्टीमुळे संरक्षक भिंत पाटील यांच्या घरावरच कोसळली.सरक्षंक भिंतींचा वीटा, सिमेंट कॉक्रीटचा मलबा साखर झोपेत असलेल्या व घरात झोपलेल्या संगिता पाटील, कुणाल पाटील, दिपेश पाटील यांच्यावर पडला.

मलब्याखाली दबल्याने आई- मुलांसह तीघेजण गंभीर जखमी झाले आहेत.वैभव पाटील हा दुसऱ्या खोलीत झोपलेला असल्याने त्याला कोणतीही दुखापत झाली नाही. आरडाओरडा झाल्याने शेजाऱ्यांनी तत्काळ धाव घेत मलब्याखालुन जखमींना बाहेर काढून उपचारासाठी ॲम्ब्युलन्समधुन नवी मुंबईतील डी.वाय पाटील रुग्णालयात दाखल केले आहे.संगीता यांना शरीरातील ठिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर फ्रॅक्चर आणि गंभीर दुखापत झाल्याने तातडीने दोन तर कुणाल यांच्या पायाला गंभीर इजा झाल्याने एक शस्त्रक्रिया करण्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.शस्त्रक्रियेसाठी दोघांनाही एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याची माहिती उरण तहसीलदार कार्यालयातुन देण्यात आली.

टॅग्स :uran-acउरण