शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव ट्रकच्या धडकेत रायगडमध्ये तीन ठार, आठ जणांना उडवले; एक अत्यवस्थ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 07:00 IST

रेवदंडा येथील जेएसडब्ल्यू येथून रोहाच्या दिशेने येणाऱ्या ट्रक चालकाने भरधाव गाडी चालवत रेवदंडा ते चणेरा मार्गावर तब्बल आठ जणांना ठोकरले. त्यातील तीन जण जागीच ठार झाले, तर एक महिला अत्यवस्थ आहे.

रोहा/ धाटाव : रेवदंडा येथील जेएसडब्ल्यू येथून रोहाच्या दिशेने येणाऱ्या ट्रक चालकाने भरधाव गाडी चालवत रेवदंडा ते चणेरा मार्गावर तब्बल आठ जणांना ठोकरले. त्यातील तीन जण जागीच ठार झाले, तर एक महिला अत्यवस्थ आहे. प्राथमिक माहितीनुसार, चार जण जखमी आहेत.या ट्रक चालकाने साळाव, आमली येथे प्रत्येकी एकाला, तर चेहेर येथे दोन पादचाऱ्यांना ठोकर मारून जखमी केले. त्यानंतर, हा ट्रक रोह्याच्या दिशेने निघाला. तोपर्यंत पुढील गावात या घटनेची माहिती मिळाल्याने स्थानिकांनी ट्रक अडविण्याचा प्रयत्न केला असता, त्याने अनेक गाड्या व अडथळे उडवले. त्यानंतर, न्हावे फाटानजीक एका जोडप्याला व त्यांच्या लहानग्या मुलाला उडवले. यात जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक लक्ष्मण ढेबे व त्यांचा मुलगा जागीच ठार झाला असून, त्यांच्या पत्नीचे दोन्ही पाय निकामी झाले आहेत. ही धडक इतकी जोरात होती की, संबंधित शिक्षकाच्या गाडीचा चक्काचूर झाला असून, गाडी सुमारे चारशे मीटर अंतरापर्यंत फरफटत गेली. त्यानंतर, चालकाने सारसोली गावाच्या पुढे चणेरा येथील नागरिक उदय वाकडे याला ठोकरल्याने त्यांचाही जागीच मृत्यू झाला आहे. या चालकाला चांडगावनजीक स्थानिक युवकांनी धाडसाने पकडून पोलिसांच्या हवाली केले आहे. या घटनेची माहिती मिळताच, स्थानिक उपविभागीय पोलीस अधिकारी, तसेच पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांनी घटनास्थळी धाव घेतली. 

टॅग्स :AccidentअपघातRaigadरायगड