शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
3
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
4
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
5
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
6
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
7
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
8
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
9
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
10
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
11
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
12
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
13
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
14
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
15
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
16
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
17
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
18
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
19
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
20
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

जेएनपीटीच्या तीन क्रे न्स भंगारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 03:11 IST

बंदराचा व्यापार कोलमडणार? : वादळी पावसाच्या तडाख्याने कोट्यवधींचे नुकसान

उरण : मालवाहू जहाजातील मालाचे कंटेनर चढ-उतार करणाऱ्या रेल माऊंटन क्यूसी क्रेन्स म्हणजे जेएनपीटी बंदराचे कामकाज करणारे हातच आहेत. बुधवार, ५ आॅगस्ट रोजी आलेल्या भयानक वादळी पावसात जेएनपीटीच्या तीन क्रेन्स तुटून पडल्या. यामुळे जेएनपीटीच्या कामकाजावर परिणाम तर होणारच आहे; मात्र उर्वरित असलेल्या सात क्यूसी क्रेनद्वारेच यापुढे कंटेनर मालाची हाताळणी करावी लागणार असल्याची माहिती जेएनपीटीचे वरिष्ठ प्रबंधक तथा सचिव जयंत ढवळे यांनी दिली.

बुधवारी दुपारी तीन-चार वाजण्याच्या सुमारास जोरदार आलेल्या वादळाच्या तडाख्यात जेएनपीटीच्या मालकीच्या बंदरात उभ्या असलेल्या तीन क्यूसी क्रेन्स सापडल्या. ४० मीटर उंचीच्या आणि जहाजातील मालाचे कंटेनर चढउतार करणाºया ६, ७, ८ क्रमांकाच्या तीन क्यूसी क्रेन्स पाहता पाहताच मागच्या बाजूला थेट समुद्रात पत्त्यासारख्या कोसळल्या. सुदैवाने कंटेनर लोडिंग केल्यानंतर मालवाहू जहाज दुपारी १.३० वाजताच बंदरातून रवाना झाले होते. त्यामुळे तीनही क्यूसी क्रेन्सवरील कामगार अपघाताआधीच बाहेर पडले होते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली असल्याची माहिती जेएनपीटी प्रशासनाचे वरिष्ठ प्रबंधक जयंत ढवळे यांनी दिली.नैसर्गिक आपत्तीत एक नव्हे, तर तीन क्यूसी क्रेन्स मोडून पडल्या आहेत. मोठ्या प्रमाणात झालेल्या आर्थिक नुकसानीचा आढावा घेण्याचे काम संबंधित विभागाकडून सुरू करण्यात आले आहे. त्यांच्याकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतरच आर्थिक नुकसानीची नेमकी माहिती कळू शकेल, असेही ढवळे यांनी सांगितले.कु ठे चूक झाली? चौकशीची गरज: वादळी वाºयासह नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी क्यूसी क्रेन्स हायड्रोलिक लॉक करून ठेवण्याची व्यवस्था आहे. यामध्ये तर काही चूक झाली नाही ना? याचीही चौकशी करण्याची आवश्यकता आहे. जेएनपीटीच्या बुधवारी कोसळलेल्या तीनही क्रेन्स भंगारातच गेल्या आहेत. आणखी तीन क्रेन्स स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात आल्याखेरीज सुरू होणार नाहीत. त्यामुळे सध्या तरी चार क्यूसी क्रेन्सवरच जेएनपीटी बंदराला कामकाज करावे लागणार असल्याचे कामगारांकडून सांगितले जात आहे.सूचना असूनही खबरदारीकडे दुर्लक्षबुधवारी जोरदार आलेल्या वादळात जेएनपीटीच्या मालकीच्या बंदरात मालवाहू जहाजातील कंटेनर मालाची चढउतार करणाºया तीन रेल माऊंटन क्यूसी क्रेन्स कोसळून निकामी झालेल्या आहेत. एकाच वेळी दोन कंटेनर चढउतार करण्याची क्षमता असलेल्या एका क्रेनची किंमत साधारणत: ६० ते ६५ कोटींच्या आसपास आहे. याआधीच दहापैकी आणखी तीन क्रेन्स एकमेकांवर आदळून निकामी झालेल्या असल्याचे कामगारांकडून सांगितले जात आहे. या क्रेन्सचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात आल्याखेरीज मालाची चढउतार करणे शक्य होणार नाही. वादळाची आगामी सूचना दिली असतानाही प्रशासनाने खबरदारी घेतली नसल्याचा आरोपही कामगारांकडून केला जात आहे.

टॅग्स :RaigadरायगडRainपाऊस