- प्रवीण देसाईरायगड : दुर्गराज रायगडावर बुधवारी होत असलेल्या ३४५व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी स्वछता मोहीम राबवून गड स्वच्छ करण्यात आला. या मोहिमेत हजारो शिवभक्त व राज्यातील विविध विद्यापीठातील एनएसएस व एनसीसीचे विद्यार्थी सहभागी झाले होते.अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे रायगडावर ६ जूनला या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. राज्यातील कानाकोपऱ्यातून हजारो युवक-युवती शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याला उपस्थिती लावतात. रायगड विकास प्राधिकरणतर्फे स्वच्छता मोहिमेची सुरुवात केली.‘फिटनेस आव्हान’नव्हे, विनंती - संभाजीराजेशिवराज्याभिषेक सोहळ्याला रायगडावर येण्यासाठी मी कोणालाही ‘फिटनेस आव्हान’ दिलेले नाही. शिवछत्रपती यांचे आचार, विचार देशाच्या कानाकोपºयातील लोकांपर्यंत पोहोचावेत यासाठी आपण सर्वांनाच शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यासाठी रायगडावर येण्याचे आवाहन केले आहे, असा टोला खासदार संभाजीराजे येथे लगावला.
हजारो हातांनी केला दुर्गराज रायगड स्वच्छ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 02:20 IST