शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ मृत्यूचे गूढ उकलले, २६ दिवसांपूर्वी सापडला होता मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 01:51 IST

रसायनी पोलिसांना २६ दिवसांपूर्वी वावेघर हद्दीत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली होती. परंतु रसायनी पोलिसांनी फिरवलेल्या तपास चक्राने त्या व्यक्तीच्या हत्येचे गूढ उकलले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमोहोपाडा : रसायनी पोलिसांना २६ दिवसांपूर्वी वावेघर हद्दीत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली होती. परंतु रसायनी पोलिसांनी फिरवलेल्या तपास चक्राने त्या व्यक्तीच्या हत्येचे गूढ उकलले आहे. मृतदेहाच्या मुखातील चांदीचा दात आणि सदºयाची गुंडी यांचा आधार घेत एपीआय दत्तात्रेय बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय धनंजय तेलगोटे यांनी तरूणाच्या मारेकºयांचा तपास केला. यात मृत व्यक्तीचे मित्र आणि त्यांच्या आप्त नातेवाइकांचा समावेश असल्याचे उघडकीस आले आहे.रसायनी पोलीस ठाण्याचे पीएसआय धनंजय तेलगोटे यांनी तपास केला असता अनैतिक संबंधातून गोपाळ सितू पवार (२९, मूळ राहणार गुलबर्गा, कर्नाटक) यांचा खून झाल्याचे उघडकीस आले असून आरोपी हे गोपाळ याचे मित्र असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. वावेघर गेट क्र मांक १ जवळ १८ आॅक्टोबर रोजी झुडपात एका व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. यावेळी मृतदेहाची ओळख न पटल्याने व कुजलेल्या अवस्थेत असल्याने पोलिसांनी बेवारस म्हणून नोंद केली होती. यावेळी या मृतदेहाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. शिवाय गोपाळ पवार यांच्या नातेवाइकांनी बरेच दिवस गोपाळशी संपर्क होत नसल्याने शोधाशोध सुरु केली होती. यावेळी पीएसआय धनंजय तेलगोटे यांनी महत्त्वाची कामगिरी बजावत गोपाळच्या नातेवाइकांचा तपास घेऊन त्यांना गोपाळच्या काही वस्तू दाखवताच त्यांना ओळख पटली. गोपाळचे आणि त्याचा मित्र यांचे भांडण झाले असल्याची माहिती नातेवाइकांना अगोदर मिळाली होती.

टॅग्स :Crimeगुन्हाMurderखून