शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ पाच शेतकºयांना समर्थन : टाटा प्रकल्पाला विरोध; चारशे शेतकºयांनी नोंदवले म्हणणे  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 07:00 IST

शहापूर-धेरंड येथील प्रस्तावित टाटा औष्णिक वीज प्रकल्पाला स्थानिक शेतकºयांचा विरोध असून यामधील पाच शेतक-यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

अलिबाग : शहापूर-धेरंड येथील प्रस्तावित टाटा औष्णिक वीज प्रकल्पाला स्थानिक शेतकºयांचा विरोध असून यामधील पाच शेतक-यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या पाच शेतकºयांव्यतिरिक्त अन्यही शेतकºयांचा विरोध आहे. या पार्श्वभूमीवर सर्व शेतकºयांचे म्हणणे जाणून घेण्याकरिता सर्वोच्च न्यायालयाचे प्रतिनिधी न्यायाधीश तथा रायगड जिल्हा व सत्र न्यायाधीश मु.गो.सेवलीकर यांच्यासमोर पोलीस मुख्यालयाच्या जंजिरा सभागृहात मंगळवारपासून सुरु झालेल्या सुनावणीअंतर्गत बुधवारअखेर शहापूर व धेरंड गावांतील एकूण ९८० शेतकºयांपैकी ४०१ शेतकºयांनी आपले म्हणणे मांडले आहे. सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे शेतकरी प्रतिनिधी प्रवीण काशिनाथ भगत (रा.मोठे शहापूर), आत्माराम गोमा पाटील (रा.मोठे शहापूर), विनायक हरिभाऊ पाटील (रा.धाकटे शहापूर),काशिनाथ पुंडलिक पाटील (रा.धेरंड) आणि वसंत शंकर पाटील (रा.धेरंड) या पाच जणांच्या भूमिकेच्या समर्थनार्थ आपले म्हणणे नोंदविले असल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हा समन्वयक राजन भगत यांनी दिली आहे.या पाच शेतकºयांनी सर्व शेतकºयांचे प्रतिनिधी शेतकरी म्हणून २०१२ मध्ये अ‍ॅड.कोलिन गोन्सालवीस आणि अ‍ॅड.गायत्री सिंग यांच्या माध्यमातून, ‘एमआयडीसी’ने केलेल्या या भूसंपादनाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील शहापूर-धेरंड आदी नऊ गावांच्या क्षेत्रावर टाटा-रिलायन्सचे औष्णिक वीज प्रकल्पासाठी तेथील शेतकºयांच्या जमिनी घेण्यात आल्या आहेत. याचिका दाखल केलेल्या पाच शेतकºयांची केवळ तीन एकर शेतजमीन आहे. उर्वरित २ हजार ५०० शेतकºयांची १२०० एकर जमीन कंपनीने आधीच विकत घेतली असल्याने या पाच शेतकºयांनी दाखल केलेली याचिका फेटाळण्यासाठी एमआयडीसीच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयास विनंती केली होती. मात्र शेतकºयांच्या बाजूने सर्वोच्च न्यायालयात लढणाºया अ‍ॅड. गायत्री सिंग यांनी या प्रकरणात नक्की किती शेतकरी होरपळले आहेत याची चौकशी करावी. तसेच ज्या शेतकºयांच्या जमिनी घेतल्या असे सांगण्यात येत आहे, त्या शेतकºयांनी जमिनीच्या किमतीचे पैसे घेतलेले नाहीत अशी वस्तुस्थिती सर्वोच्च न्यायालयात नमूद केली होती. अ‍ॅड. गायत्री सिंग यांनी मांडलेली भूमिका मान्य करुन सर्वोच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाचे प्रतिनिधी नियुक्त करुन उर्वरित शेतकºयांचे म्हणणे जाणून घेण्याचा हा निर्णय घेतला.५८९ शेतकºयांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी गावांत दवंडीमंगळवारपासून सुरु झालेल्या या सुनावणीत दोन दिवसांत एकूण ९८० शेतकºयांपैकी ४०१ शेतकºयांनी येवून आपले म्हणणे मांडले आहे.सुनावणीचा उद्याचा अखेरचा दिवस असल्याने उर्वरित ५८९ शेतकºयांपर्यंत या सुनावणीची माहिती पोहोचवण्याकरिता बुधवारी संध्याकाळपासून श्रमिक मुक्ती दलाच्या कार्यकर्त्यांनी शहापूर धेरंड गावांसह परिसरातील वाड्या-पाड्यात जावून दवंडी पिटण्यास प्रारंभ केला असल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे सुनील नाईक यांनी सांगितले.दरम्यान गेले दोन दिवस आपले म्हणणे मांडण्याकरिता येणाºया शेतकºयांना आवश्यक ते मार्गदर्शन सुनील नाईक, नंदकुमार पाटील, राजन भगत, बाळा पाटील, आत्माराम पाटील आदि कार्यकर्ते करीत आहेत.सर्वोच्च न्यायालय प्रतिनिधी न्यायाधीशांसमोर सुनावणी सुरु असून शेतकरी समाधानी आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीRaigadरायगड