जयंत धुळप, अलिबागनिसर्र्ग कोपल्यानंतर काय अनर्थ होतो याचे वास्तव २५ जुलै २००५ रोजी रायगड जिल्ह्यात महाड व पोलादपूर तालुक्यांत आलेल्या महापुरासोबतच्या भूस्खलनाच्या निसर्गापत्तीच्या निमित्ताने कोकणवासीयांना अनुभवास आले, त्या निसर्गापत्तीस यंदा दहा वर्षे पूर्ण होत आहेत. अतिवृष्टी झाली, नद्या दुथडी भरून वाहू लागल्या, गावात पुराचे पाणी भरू लागले, जनजीवनच ठप्प झाले, कोकण रेल्वेमार्गही अनेक ठिकाणी वाहून गेला, महामार्ग बंद झाले, अनेक घरांबरोबरच पोलादपूरचं सुंदरराव मोरे कॉलेज वाहून समूळ नष्ट झाले. अतिवृष्टीमुळे डोंगरांच्या महाकाय दरडी महाड तालुक्यात जुई, कोंडिवते, रोहण, दासगाव गावांवर कोसळल्या. यात २४० जणांचा मृत्यू झाला. याच डोंगररांगांतील पोलादपूरमधील तुटवली डोंगरावरील २५० ग्रामस्थांचे स्थलांतर करण्यात आले आणि तिरका झालेला तुटवलीचा डोंगर दुसऱ्या दिवशी अखेर कोसळला, पण सर्व ग्रामस्थ बचावले. दरडी कोसळण्यास अतिवृष्टीच कारणीभूत असल्याचा दावा सरकारी यंत्रणा तेव्हा करीत असली तरी त्यामागे भूकंप हे एक महत्त्वाचे कारण असल्याचा अभ्यासकांचा दावा आहे.
भूस्खलनाच्या ‘त्या’ काळ्या स्मृती
By admin | Updated: July 25, 2015 03:57 IST