शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

रिलायन्सविरोधी प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाचा तेरावा दिवस, वारकरी मंडळींचा पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2020 01:08 IST

Raigad News : आंदोलन मागे घेतल्यावरच सकारात्मक चर्चा करू, हा हेका रिलायन्सने कायम ठेवल्याने बुधवारच्या ’तेराव्या’ दिवसापर्यंत प्रश्न मार्गी लागलेला नाही.

नागोठणे :  आंदोलन मागे घेतल्यावरच सकारात्मक चर्चा करू, हा हेका रिलायन्सने कायम ठेवल्याने बुधवारच्या ’तेराव्या’ दिवसापर्यंत प्रश्न मार्गी लागलेला नाही. दुसऱ्या बाजूला ठिय्या आंदोलनास बसलेल्या प्रकल्पग्रस्तांचा आत्मविश्वास वाढत असल्याचे दिसून येत असून, आंदोलनकर्त्यांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे. मंगळवारी सायंकाळी उशिरा रोहे तसेच सुधागड, माणगाव तालुक्यातील वारकरी संप्रदायाच्या शेकडो मंडळींनी या ठिकाणी येत आपला सक्रिय पाठिंबा असल्याचे जाहीर केले.मागण्या मान्य झाल्याशिवाय येथून उठायचेच नाही, हा संकल्प लोकशासन आंदोलन संघर्ष समितीच्या माध्यमातून आंदोलनकर्त्यांकडून केला जात आहे. तर, आंदोलनकर्ते आणि रिलायन्स व्यवस्थापन यांच्यात काही बैठका झाल्या आहेत. बैठकीला रिलायन्सकडून ठोस निर्णय घेण्याचा अधिकार नसलेले वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहात असले तरी, दरवेळी आंदोलन मागे घेतल्यावरच सकारात्मक चर्चा केली जाईल असे त्यांच्याकडून वारंवार बोलले जात आहे. हे व्यवस्थापन स्थानिक पत्रकारांशी संवाद साधण्यातसुद्धा तयार नसल्याने तेराव्या दिवसापर्यंत रिलायन्सची भूमिका स्पष्ट होऊ शकली नाही. आंदोलनकर्ते आपल्या मागाण्यांपासून तसूभरही मागे हटले नसल्याचे स्पष्ट होत आहे. संघटनेचे राष्ट्रीय संघटक राजेंद्र गायकवाड येथे महिनाभर तंबू ठोकूनच बसले असून, आज त्यांना ज्या प्रकल्पग्रस्तांकडे शासनाकडून प्रमाणपत्र मिळाले आहे त्यातील काही तरुण मंडळी रिलायन्स कंपनीतील ठेकेदारांकडे आजही कामावर जातात व आपल्या आई, वडील किंवा पत्नीला आंदोलनासाठी पाठवतात असे आढळून आले. या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त करताना गायकवाड यांनी उद्यापासून हे कामगार कामावर गेल्याचे निदर्शनास आल्यास त्यांचे नाव आंदोलनातून काढण्यात येईल असा इशारा दिला.

टॅग्स :RaigadरायगडRelianceरिलायन्स