शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

महिनाभरात कुंडलिका नदीला तिसरा मोठा पूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 02:23 IST

वाहतुकीचा खोळंबा : रोहा-आष्टमी पूल पाण्याखाली

रोहा : तालुक्यात होत असलेल्या जोरदार पावसाने कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे; यामुळे गेल्या महिनाभरात तिसऱ्यांदा मोठी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.रोहा अष्टमी दरम्यान असलेल्या जुन्या पुलावर ४ ते ५ फूट पाणी होते तर नव्याने बांधण्यात आलेल्या उंच पुलावरून पाणी वाहत होते. पुराच्या पाण्यामुळे वाहतूक खोळंबल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. रोहा-अष्टमी शहरासह वरसे, रोठ, धाटावमध्ये पुराचे पाणी शिरले. ऐन गणेशोत्सवात नदीला पूर आल्याने गणराया आता पावसाला थांबव असा धावा गणेशभक्तांकडून केला जात आहेत.

गेली दोन दिवस मुसळधार पावसाने सबंध तालुक्याला झोडपून काढले. सतत कोसळणाºया पावसाने कुंडलिका नदीला महिनाभरात तिसरा मोठा पूर आला. पहाटेपासून नदीची पातळी जलद गतीने वाढू लागली. रोहा शहरातील नगरपालिका चौक, सावरकर मार्ग, कोर्ट रोड, मुख्य बाजारपेठ, सत्यनारायण रोड, बोहरी गल्ली, एस.टी. स्टँड समोर, फिरोज टॉकीज लगत आदी भागात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. बाजारपेठेत काही दुकानांमध्ये तर बायपास रोड, दमखाडी, रायकर पार्क, चनेवाले कॉम्प्लेक्स, डबीर चाळ, गोकु ळ बिल्डिंग, मुरुड रोड, अष्टमीसह वरसे, रोठ, धाटावमध्ये पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात शिरले. अष्टमीत आणि कोलाड मार्गावर पाणी भरल्याने पलिकडील गावांचा संपर्क तुटला. कुंडलिका नदी पात्रात करण्यात आलेल्या मोठ्या प्रमाणातील माती भरावामुळे शहरातील सखल भागासह वरसे, रोठ आदी नदी लगतच्या परिसरात पुराचे पाणीशिरत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले.गेल्या ३ आॅगस्टला रोहा तालुक्यात २९५ मिमी इतका पाऊस झाला होता, त्याच्या तुलनेत बुधवारी ४ स्पटेंबर रोजी २५७ मिमी एवढा कमी पाऊस होऊनही नदीची पाणी पातळी वाढली. बाजारपेठ, एस टी स्टँड, धनगर आळी आदी ठिकाणी यावेळी पुराचे पाणी शिरले, कमी पाऊस होऊनही पूरपरिस्थिती अधिक प्रभावी बनल्याने नागरिकांत संभ्रमावस्था आहे. सखल भागात पाण्याची पातळी वाढत असल्यामुळे गणराया आता पावसाला थांबव असा धावा गणेशभक्तांकडून केला जात आहेत. प्रशासनासह नगराध्यक्ष संतोष पोटफोडे व त्यांचे सहकारी पूरपरिस्थितीवर लक्ष ठेवून पाहणी करत होते.

टॅग्स :RaigadरायगडalibaugअलिबागRainपाऊसriverनदी