शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

‘रेमडेसिवीर’चा पुरेसा साठा, तुटवडा नसल्याने धोका नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 01:12 IST

raigad : जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनसह अन्य औषधांचा पुरेसा साठा असल्याने काेणतीच धावपळ हाेणार नसल्याचे चित्र आहे. 

रायगड : गेल्या महिन्यापासून काेराेना रुग्ण संख्येमध्ये घट हाेत आहे. त्यामुळे रुग्णालयांमध्ये उपचारासाठी रुग्णांची संख्या कमी असल्याने रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर कमी झाला आहे. जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनसह अन्य औषधांचा पुरेसा साठा असल्याने काेणतीच धावपळ हाेणार नसल्याचे चित्र आहे. अद्यापही काेराेनावरील लस बाजारात उपलब्ध झालेली नसल्याने रेमडेसिवीर इंजेक्शनवरच रुग्णांची मदार असल्याचे दिसून येते. काेराेना संसर्गाचा धाेका अधिक हाेता. त्या कालावाधीमध्ये रुग्णांची संख्या जास्त हाेती. त्यामुळे रुग्णालयातील बेड, आयसीयू बेड,व्हेंटिलेटर बेड मिळविण्यासाठी रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांना चांगलीच कसरत करावी लागत हाेती. सरकार आणि प्रशासनाने काेराेनाला राेखण्यासाठी शक्यत्या उपाययाेजना केल्या हाेत्या. काेराेना राेगावर प्रभावी लस आलेली नसल्याने रुग्णांना बरे करण्यासाठी अन्य औषधांबराेबरच ज्यांना गरज आहे. त्यांना इंजेक्शन द्यावे लागते. सुरुवातीच्या कालावधीत हे प्रमाण ३०० पर्यंत हाेते. मात्र, काेराेनाचा संसर्ग सध्या बऱ्यापैकी कमी झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे सध्या सुमारे ३० रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज लागत असल्याचे आराेग्य विभागाचे म्हणणे आहे. रुग्णसंख्या वाढली, तरी जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा उपलब्ध आहे. ३० इंजेक्शनची दररोज गरजरुग्णसंख्या कमी असल्याने दिवसाला ३० रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज आहे. प्रत्येक रुग्णांना गरज लागतेच असे नाही, तसेच आवश्यक असलेल्यांना पूर्ण सहा डाेसचीही गरज लागत नाही.त्यामुळे सध्या तरी जिल्ह्यात धावपळ उडेल, असे चित्र सध्या दिसते आहे. 

ॲंटिजन टेस्ट, औषधी साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध n सध्या रुग्णसंख्या कमी असल्याने औषधांचा वापर कमी झाला आहे. सहा हजार अँटिजन टेस्ट किट आराेग्य विभागाकडे उपलब्ध आहेत. संबंधित रुग्णालयांना ते वितरितही करण्यात आले आहेतn तसेच, महत्त्वाचा औषध साठा मुबलक प्रमाणात आहे. काेराेनाचा फैलाव झाला, तरी ताे कमी पडणार नाही. गरज वाटल्यास सरकारकडे त्यांची मागणी करण्यात येऊन औषधे कमी पडणार नाहीत, याची दक्षता घेतली जात आहे. त्यामुळे सध्या तरी काळजीचे कारण नाही.

सध्या काेराेनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे रुग्ण संख्येवरून दिसून येते. त्यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शनसह अन्य औषधांची जास्त गरज भासत नाही. आपल्याकडे सर्व औषधांचा मुबलक साठा आहे. गरज लागल्यास नक्कीच राज्य सरकारकडे मागणी करण्यात येणार आहे. - डाॅ.सुहास माने,जिल्हा शल्यचिकित्सक, रायगड

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRaigadरायगड