शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

गडब येथे पाच घरफोड्या, नागरिक भयभीत, दीड लाखाचा ऐवज लंपास  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 06:57 IST

पेण तालुक्यातील गडब येथील रात्रीच्या सुमारास बंद घराच्या दरवाजाचे कुलूप कोयंडे तोडून पाच घरातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरून नेण्याची घटना घडली. यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

वडखळ - पेण तालुक्यातील गडब येथील रात्रीच्या सुमारास बंद घराच्या दरवाजाचे कुलूप कोयंडे तोडून पाच घरातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरून नेण्याची घटना घडली. यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.गडब येथे शुक्रवारी ५ जानेवारीच्या पहाटे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी येथील अनंत बैकर, कृष्णा म्हात्रे, हरिश्चंद्र झेले, सुमन म्हात्रे, पांडुरंग पाटील यांच्या पाच बंद घराच्या दरवाजाचे कडीकोयंडे तोडून व घरातील कपाट फोडून रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा सुमारे एक ते दीड लाख रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला तर एका ठिकाणी दरवाजा तोडत असताना शेजाºयांना चाहूल लागताच चोरांनी दरवाजाचे कुलूप तोडण्यासाठी वापरत असलेले हत्यार (कटावणी) तेथेच टाकून पळ काढला.या घटनेची माहिती वडखळ पोलिसांना मिळताच तत्काळ घटनास्थळी भेट दिली तर काराव-गडब ग्रामपंचायतीच्या सरपंच अर्पणा कोठेकर, उपसरपंच नितीन पाटील, सदस्य मिथुन पाटील, माजी उपसरपंच तुळशिदास कोठेकर, संजय पाटील,आदर्श युवा संघटनेचे अध्यक्ष के.जी. म्हात्रे यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेची नोंद वडखळ पोलीस ठाण्यात करण्यात आली असून वडखळ पोलीस निरीक्षक अप्पासाहेब लेंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली वडखळ पोलीस तपास करीत आहेत.पोलीस गस्त वाढविणारघरफोड्यांच्या संदर्भात वडखळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस पाटलांची तातडीची बैठक घेऊन गावामध्ये गस्त पथक नेमण्याच्या सूचनादिल्या तर या परिसरातील ग्रामपंचायतींना देखील गस्त पथक नेमण्याच्या सूचना देवून गावामध्ये दवंडी देवून ग्रामस्थांना सतर्क राहण्यास सांगितले, तर पोलिसांची गस्त वाढविणार असल्याचे वडखळ पोलीस निरीक्षक अप्पासाहेब लेंगरे यांनी सांगितले. काराव-गडब ग्रामपंचायतीअंतर्गत येणाºया मुख्य रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे अशी मागणी काराव - गडब ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे केली आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा