शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

नाट्यगृह लवकरच सेवेत रुजू करणार

By admin | Updated: January 4, 2016 02:03 IST

लोकमत अलिबाग (रायगड) कार्यालयाचा व्दितीय वर्धापन दिन रविवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी कार्यालयात येऊन सत्यनारायण पूजेचे दर्शन घेऊन

अलिबाग : लोकमत अलिबाग (रायगड) कार्यालयाचा व्दितीय वर्धापन दिन रविवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी कार्यालयात येऊन सत्यनारायण पूजेचे दर्शन घेऊन ‘लोकमत’ परिवारास शुभेच्छा दिल्या. रविवारी सकाळीच रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आमदार जयंत पाटील आणि पीएनपी एज्युकेशन सोयायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील यांनी कार्यालयास भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी आजच्या वृत्तपत्र प्रगतीच्या अनुषंगाने संवाद साधताना आमदार जयंत पाटील म्हणाले, की येत्या काळात प्रिंटिंग टेक्नॉजीमध्ये मोठा बदल होणार आहे. त्यामुळे छपाईचा वेळ अत्यल्प होणार आहे. त्याचा सर्वाधिक फायदा वृत्तपत्रांना होणार आहे. दरम्यान, अलिबागमध्ये नाट्यगृह नसल्याने नाट्यरसिकांना नाट्यानुभवास वंचित राहावे लागत असल्याचे त्यांच्या लक्षात आणून देताच आमदार पाटील म्हणाले, की नाट्यगृह बांधून तयार आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे ते सुरू करण्यात येऊशकले नाही. परंतु आता अलिबागच्या रसिकांची भूक भागवण्याकरीता नाट्यगृह लवकरच सेवेत रुजू करण्याचा ा्रयत्न असल्याचे आ. पाटील यांनी सांगितले. रायगडचे जिल्हा पोलीस अधीक्षक मो.सुवेझ हक यांनी लोकमत मुंबई आवृत्तीचे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर यांना पुष्पगुच्छ देऊन संपूर्ण लोकमत टीमला शुभेच्छा दिल्या. यावेळी लोकमतचे व्यवस्थापक (एचआर) सचिन लिगाडे, मुंबई विभाग वितरण व्यवस्थापक शरद सुरवसे, सागर गावंडे, समीर कुलकर्णी, जयंत धुळप, आविष्कार देसाई, गणेश दाते, शैलेश पाटील आदी उपस्थित होते. दिवसभरात लोकमत कार्यालयात माजी आमदार मधुकर ठाकूर, अलिबाग नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षा सुरक्षा शाह, न.पा. विरोधी पक्षनेते अ‍ॅड. प्रवीण ठाकूर, रायगड जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा अ‍ॅड. श्रद्धा ठाकूर, अ‍ॅड. उमेश ठाकूर, रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुळकर्णी, कुरूळ येथील सृजन विद्यालयाच्या प्रयोगशील मुख्याध्यापिका कवयित्री सुजाता पाटील, नागाव हायस्कुलच्या मुख्याध्यापिका भावेश्री वाळंज, उमेश वाळंज, रायगड जि.प. शिक्षणाधिकारी शेषराव बढे, नरेश पाटील, रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक, गॅलेक्सी अ‍ॅड. अ‍ॅन्ड मीडिया सव्हिसेसच्या संचालिका शारदा धुळप, आबिका योग कुटीरचे योगशिक्षक वीरेंद्र पवार, स्थापत्य विशारद प्रल्हाद पाडळीकर, पीएनपी एज्युकेशन सोयटीचे जनसंपर्क अधिकारी अमोल नाईक, जिल्हा परिषदेचे कक्ष अधिकारी संजीव मोरे, आदी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.