शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

उद्ध्वस्त झालेल्या इर्शाळवाडी पुनर्वसनाची प्रतीक्षा संपता संपेना; घरांच्या वाटपाची प्रक्रियाही रखडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2024 11:26 IST

विविध कारणांमुळे स्वातंत्र्य दिनाचा मुहूर्त हुकला, आपदग्रस्त हवालदिल

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: गेल्या वर्षी जुलै महिन्यात मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालेल्या इर्शाळवाडीतील आपदग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रकल्प सिडकोने निर्धारित वेळेत पूर्ण केला. स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर हक्काच्या घरात जाण्याची अपेक्षा होती. मात्र, विविध कारणांमुळे घरांच्या वाटपाची प्रक्रिया रखडल्याने स्वातंत्र्य दिनाचा मुहूर्त हुकल्याने आपदग्रस्त हवालदिल झाले आहेत.

गेल्या वर्षी २७ जुलै रोजी दरड कोसळून मोठ्या प्रमाणात जीवितहानी होऊन इर्शाळवाडीतील ४४ कुटुंबे बेघर झाली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दरडग्रस्तांचे पुनर्वसन करण्याचे निर्देेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी सूचित केलेल्या २.६ हेक्टर जागेवर राज्य रस्ते विकास महामंडळाने तयार केलेल्या विकास आराखड्यानुसार सिडकोने पुनर्वसन प्रकल्प उभारला आहे. सध्या हे काम पूर्ण झाले असून, स्वातंत्र्यदिनी आपदग्रस्तांना त्यांच्या हक्काच्या घरांचे वाटप होईल, असे अडाखे बांधले जात होते.

३० कोटींचा खर्च

प्राथमिक शाळा, अंगणवाडी, समाज मंदिर, उद्यान, खेळाचे मैदान, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच पाणी, वीज आणि रस्ते आदी सोयी-सुविधा उपलब्ध केल्या आहेत. या प्रकल्पावर सिडकोने तीस कोटींपेक्षा अधिक खर्च केला आहे.

३०० चौरस मीटरची घरे

नानिवली गावातील २.६ हेक्टर जागेवर इर्शाळवाडी आपदग्रस्तांसाठी पुनर्वसन प्रकल्प उभारला आहे. या ठिकाणी आपदग्रस्तांसाठी ४४ घरे बांधली जात आहेत. आपदग्रस्तांसाठी प्रत्येकी ३०० चौरस मीटर क्षेत्रफळावर ४४ घरे बांधली आहेत. ही जागा काही प्रमाणात जमिनीपासून उंचावर आहे. असे असले तरी भविष्यातील धोका टाळण्यासाठी जागेच्या बाजूस आरसीसी संरक्षक भिंत बांधली आहे.

टॅग्स :Raigad Irshalwadi Landslide Incidentरायगड इर्शाळवाडी दुर्घटना प्रकरणNavi Mumbaiनवी मुंबई