शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कंपनीचे उत्पादन बंद होते, प्लांटमध्ये ड्रम आले कुठून?, ‘ब्ल्यू जेट हेल्थकेअर’ची चौकशी होणे गरजेचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2023 11:26 IST

अपघातानंतर कारखान्याच्या कामगारांच्या सुरक्षेबाबत, कारखान्याच्या परवान्याबाबत, होत असलेल्या उत्पादनाबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

महाड : महाड एमआयडीसीमधील ‘ब्लू जेट हेल्थकेअर’ कंपनीमध्ये ३ नोव्हेंबर रोजी आग लागून झालेल्या अपघातात ११ कामगारांचा मृत्यू झाला होता. या कामगारांच्या अपघाताला जबाबदार कोण, याबाबत सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. याठिकाणी असलेली जुनी कंपनी ‘ब्लू जेट हेल्थकेअर’ व्यवस्थापनाने घेतली होती, यामुळे कंपनीचे उत्पादनदेखील सुरू नव्हते. मग ज्या प्लांटमध्ये अपघात झाला. त्या प्लांटमध्ये रसायनाने भरलेले ड्रम आले कुठून, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

अपघातानंतर कारखान्याच्या कामगारांच्या सुरक्षेबाबत, कारखान्याच्या परवान्याबाबत, होत असलेल्या उत्पादनाबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. याबाबत प्रशासकीय पातळीवर चौकशी समिती स्थापन केली आहे. मात्र, ज्यांच्या हातात कंपन्यांचे नियंत्रण आहे त्यांच्याकडेच चौकशी करण्याचे आदेश दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या समितीकडून सखोल चौकशी केली जाईल का, याबाबत नागरिकांमध्ये साशंकता आहे. 

काय काम सुरू होते?ज्या कंपनीत अपघात झाला त्या कंपनीचे पूर्वीचे नाव अंजनिया आणि डॉ. डॅटसन असे होते. या कंपन्या बंद पडल्यानंतर कंपनीचा प्लांट ब्ल्यू जेट हेल्थकेअर कंपनीने घेतला.  एकरभर परिसरात मूळ प्लांटच्या सभोवती काँक्रीटच्या इमारतीचे काम सुरू आहे. कंपनीची इमारती उभ्या राहत असताना जुन्या प्लांटमध्ये नक्की काय काम सुरू होते, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

कोणत्या उत्पादनास परवानगी होती?महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने अपघात झाल्यानंतर सदर कंपनीला दिलेली कन्सेंट काय होती, हे तपासण्यास सुरुवात केली.  सदर कंपनीमध्ये ‘क्यूनीन सल्फेट’ या उत्पादनाला परवानगी दिली होती. मात्र, कंपनीमधील जुन्या प्लांटमध्ये हेच उत्पादन सुरू होते का, याचे उत्तर कंपनीमध्ये आग लागल्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या ड्रम्सची तपासणी केल्यावरच निष्पन्न होणार आहे.

टॅग्स :Raigadरायगड