शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भाजपला रोखण्यासाठी डावी आघाडी एकवटली, ‘शेकाप’च्या नेतृत्वाखाली १३ पक्षांची बांधली मोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 12:25 IST

शेकापच्या वधार्पन दिनानिमित्त सुधागड येथे बुधवारी झालेल्या मेळाव्यात या आघाडीची घोषणा आ. पाटील व संभाजीराजे यांनी केली. 

सुधागड :  राज्यातील विविध १३ डाव्या पक्षांनी शेकापचे  सरचिटणीस व आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकत्रित येऊन डावी आघाडी स्थापन केली आहे. त्यामध्ये संभाजीराजे छत्रपती यांच्या  स्वराज्य पक्षाचाही समावेश असणार आहे. शेकापच्या वधार्पन दिनानिमित्त सुधागड येथे बुधवारी झालेल्या मेळाव्यात या आघाडीची घोषणा आ. पाटील व संभाजीराजे यांनी केली. 

भाजपला सत्तेपासून दूर करण्यासाठी  त्यांच्या विरोधात देशात इंडिया तर राज्यात सर्व पक्ष एकत्रित येऊन महाविकास आघाडी बनवली आहे. त्यांच्याअंतर्गत आमची आघाडी कार्यरत राहील, असे दोघांनी यावेळी जाहीर केले. यावेळी राज्यातील १३ डावे पक्षाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.   भाजप सत्तेत आल्यापासून संविधान विरोधी काम करीत आहे. राज्यात आणि देशात सत्ता काबीज करण्यासाठी भ्रष्ट राजकारण सुरू आहे. महापुरुष यांच्याबाबत अपशब्द वापरूनही भाजप सरकार पाठीशी घालत आहे. त्यामुळे २०२४च्या निवडणुकीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी डाव्या पक्षाने आघाडी बनवली आहे. 

‘या’ १३ पक्षांची आघाडीशेकाप, स्वाभिमानी पक्ष, स्वराज्य पक्ष, आम आदमी पार्टी, सीपीआय, लाल निशाण पक्ष, बहुजन विकास आघाडी, समाजवादी पार्टी, जनता दल, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हे तेरा डावे पक्ष याची आघाडी निर्माण झाली आहे. या आघाडीचे नेतृत्व शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी करावे, असे सर्वच डावे पक्षाने म्हटले आहे.

संभाजी भिडेंवर कारवाई करा : संभाजीराजेवादग्रस्त वक्तव्य करणारे संभाजी भिडे यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी संभाजीराजे यांनी केली आहे. शेकापच्या वर्धापन दिनानिमित्त प्रमुख अतिथी म्हणून ते उपस्थित होते. हे सांगलीचे गृहस्थ आमच्या महापुरुषांचा अपमान करत सुटले आहेत. कधी महात्मा फुले तर कधी महात्मा गांधींचा अवमान करतात. सरकार त्यांच्यावर कारवाई का करत नाही?, असा सवाल त्यांनी केला. 

टॅग्स :PoliticsराजकारणSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीRaigadरायगड