शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

जी-२० शिखर परिषदेच्या बैठकांना १२ ते १५ डिसेंबरपासून एलिफंटा बेटापासून सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 22:21 IST

वर्षभरात देशातील युनेस्कोच्या ४० जागतिक वारसा लाभलेल्या पर्यटन स्थळांना भेटी देणार 

मधुकर ठाकूरउरण :  एक डिसेंबरपासून पुढील वर्षभरासाठी भारत जी-२० देशाचे अध्यक्षपद भूषविणार आहे. वर्षभराच्या कार्यक्रमाअंतर्गत जी-२० शिखर परिषदेचे प्रतिनिधी भारतीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांसह वर्षभरात देशातील युनोस्कोच्या ४० जागतिक वारसा लाभलेल्या पर्यटन स्थळांना भेटी देणार आहेत. बैठका घेऊन आपला राष्ट्रीय मूर्त वारसा जगासमोर योग्य पद्धतीने दाखविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. याची सुरुवात १२ ते १५ डिसेंबरपासून वर्ल्ड हेरिटेज यादीत समावेश असलेल्या महाराष्ट्रातील  जागतिक प्रसिद्धीच्या एलिफंटा लेण्यांपासून करण्यात येणार असल्याची माहिती भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण मुंबई विभागाचे अधिक्षक डॉ. राजेंद्र यादव यांनी दिली.

देशातील देशातील ४० एएसआय स्मारकांना युनेस्कोचा जागतिक वारसा लाभला आहे. ही स्मारके देशाच्या वैविध्यपूर्ण मूर्त वारसा म्हणून जी-२० शिखर परिषदेचे प्रतिनिधींसाठी मुख्य आकर्षण असणार आहेत. या वर्षात जी-२० शिखर परिषदेच्या देशांचे अध्यक्षपद भारत भूषवत आहे. भारतीय प्रतिनिधींच्या मार्गदर्शनाखाली देशभरातील ४० जागतिक वारसा लाभलेल्या पर्यटन स्थळांना भेटी देणार आहेत. या भेटी दरम्यान बैठका घेऊन आपला राष्ट्रीय मूर्त वारसा जगासमोर योग्य पद्धतीने दाखविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहेत.

याची सुरुवात १२ ते १५ डिसेंबरपासून वर्ल्ड हेरिटेज यादीत समावेश असलेल्या जागतिक प्रसिद्धीच्या एलिफंटा लेण्यांपासून करण्यात येणार आहे. एलिफंटा बेटावर सलग तीन दिवस चालणाऱ्या या शिखर परिषदेत भारतीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांसह शिखर परिषदेचे प्रतिनिधीही सहभागी होणार आहेत.

त्यानंतर १६-१७ जानेवारीला महाराष्ट्रातील पुणे येथील आगाखान पॅलेस, शनिवारवाडा, शिवनेरी किल्ला व १३-१४ फेब्रुवारी रोजी अजंठा लेणी, एलोरा लेण्यांना भेटी देणार आहेत. वर्षभरात देशातील गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, दिल्ली, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, केरळ,तेलंगणा, बिहार, ओडिशा, गोवा,दिव,लडाख आदी राज्यांतील वर्ल्ड हेरिटेज यादीतील पर्यटन स्थळांना भेटी देणार असल्याची माहिती भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण मुंबई विभागाचे अधिक्षक डॉ.राजेंद्र यादव यांनी दिली.

टॅग्स :Indiaभारत