शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

स्मशानभूमीत सेंद्रिय फळभाज्यांसह मसाल्यांचा सुगंध दरवळतोय...; ‘मुनोत मुक्तिधाम’मध्ये वनराई; वाघिलकरांची स्वखर्चाने देखभाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2023 08:51 IST

स्मशानभूमी म्हटलं की, ओसाड रान असे चित्र असते. मात्र, पनवेलमधील जैन समाजाच्या मुनोत मुक्तिधाम ट्रस्टच्या तक्का येथील स्मशानभूमीत वनराई फुलवली आहे.

वैभव गायकरलोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : मुनोत मुक्तिधाम या स्मशानभूमीत गेल्यानंतर आपण एखाद्या वनराईत आल्याचा भास होत आहे. येथे सेंद्रिय भाजीपाला, फळांच्या झाडांसह दालचिनी, जायफळ आणि तेजपत्ता या मसाला झाडांचा दरवळ मनाला प्रसन्न करून जात आहे.

स्मशानभूमी म्हटलं की, ओसाड रान असे चित्र असते. मात्र, पनवेलमधील जैन समाजाच्या मुनोत मुक्तिधाम ट्रस्टच्या तक्का येथील स्मशानभूमीत वनराई फुलवली आहे. या स्मशानभूमीचा कायापालट येथे काम करणारे गणेश वाघिलकर यांनी केला असून, ते स्वखर्चाने या वनराईची देखभाल करीत आहेत.गाढी नदीच्या तीरावर असलेल्या या स्मशानभूमीत २०१३ पासून वाघिलकर यांनी १५ ते २० गुंठ्यांत अनेक प्रकारची झाडे लावून नंदनवन फुलविण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे ही सर्व झाडे ऑरगॅनिक पद्धतीने वाढविली आहेत. स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी लागणाऱ्या शेणी, फुले आदींचा वापर ते खतासाठी करीत आहेत.

वनराईत कशाची लागवड? वांगी, मिरची, टोमॅटो, कारली, शेवगा या भाज्यांसह गवती, ब्रह्मकमळ, कृष्णकमळ, सोनचाफा ही फुलझाडेही येथे आहेत. केळी, पपई, पेरू, बोर, जांभूळ, स्टार फळ, फणस, आवळा आदी फळांची झाडे आहेत. दालचिनी, तेजपत्ता, जायफळ आदी मसाल्यांची झाडे येथे आहेत. मघाई, पान, रक्तचंदन, सफेद चंदन, नारळ यासह प्राजक्ता, बेल, शमी, दुर्वा यांच्याही वेली येथे आहेत.

खाण्यासाठी फळभाज्यांचा वापरवनराईतील फळे, फुले तसेच फळभाज्या वाघिलकर आपल्या घरात वापरतात. विक्री करीत नाहीत. कोणी मागितले तर त्याला आवर्जून देतात.

स्मशानभूमीत कधीच कोणाला जावेसे वाटत नाही. मात्र, तक्का येथील मुनोत मुक्तिधामचा गणेश वाघिलकर यांनी कायापालट केला आहे. येथे गेल्यानंतर मन प्रसन्न होते. शहरातील प्रत्येक सोसायटीत अशी वनराई फुलवली तर सोसायटीतील वातावरणही प्रसन्न होईल.- बिपिन मुनोत, ट्रस्टी, मुनोत मुक्तिधाम, पनवेल