शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

वाघ दिसल्याने दांडगुरी परिसरात दहशत, वनविभाग तात्काळ घटनास्थळी; ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 15:44 IST

Raigad Local News : वाघाच्या नावाने अनेकांचा थरकाप उडतो. श्रीवर्धन तालुक्यातील दांडगुरी येथे गुरुवारी रात्रीच्यावेळी परिसरात असलेल्या झुडपांमध्ये  वाघाचे दर्शन झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

- गणेश प्रभाळेदिघी - वाघाच्या नावाने अनेकांचा थरकाप उडतो. श्रीवर्धन तालुक्यातील दांडगुरी येथे गुरुवारी रात्रीच्यावेळी परिसरात असलेल्या झुडपांमध्ये  वाघाचे दर्शन झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. रात्री च वनविभागाने दखल घेत भेट दिली व वाघ सदृश प्राणी असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आता सदर वाघाने आपला मोर्चा रहिवासी परिसरात वळविल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

श्रीवर्धन तालुक्यातील दांडगुरी परिसर म्हणजे जंगल क्षेत्राला जोडून असणारे गाव, तसे थंड वातावरण असलेले परिसर म्हणून याठिकाणाला ऐतिहासिक प्रसिद्धी आहे. विशेष म्हणजे सदर वाघ दिसल्यापासून सर्वांना खबर लागल्याने परिसरात आणखीच दहशत निर्माण झाली असून कोणत्याही परिस्थितीत वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. दांडगुरी, वाकलघर, आसुफ तसेच बोर्ला भागात मोठ्या प्रमाणात झुडपी जंगल आहे. याभागात नदी देखील वाहत आहे.  त्यामुळे या परिसरात वाघासह इतर प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असल्याचे समजते आहे.  

कोरोनाच्या दहशतीमध्ये सर्व लोक असतांना आता लोकांना वाघोबाचे दर्शन होत असल्याने सर्व नागरिक घाबरलेल्या स्थितीत आहेत. रात्री 10.00 वाजेच्या सुमारास दांडगुरी परिसरात देखील वाघाचे दर्शन झाले. या घटनेची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी मिलिंद राऊत यांना देण्यात आली. यामध्ये बोर्ली राउंड पथकाचे बुरान शेख, प्रतीक गजेवार, एल. एम. गिराने यांनी घटनास्थळी भेट दिली. व संशयित प्राण्याचे ठसे घेऊन वनविभागाकडून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. 

सद्या वाघ जंगल सोडून मानववस्तीत आल्याने नागरिकांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघाच्या दहशतीमुळे जंगल परिसरातील लोकांचे जगणे मुश्किल होऊन बसले आहे, शेतीची हंगामी कामे करणे, किंवा मिळेल ते काम करून आपला प्रपंच चालविणे, ही या लोकांची कामे संपूर्णपणे लॉक डाउन व वाघाच्या भीतीमुळे खोळंबली जाणार आहेत.  मात्र वनविभागाकडून जोपर्यंत वाघाचा बंदोबस्त लावला जात नाही, तोपर्यंत गावकऱ्यांमधील भीतीचे वातावरण दूर होणार नाही, हेही तितखेच खरे आहे.

आम्ही घटनास्थळी गेलो असता संशयित प्राण्याचे ठसे उमटले होते. तपासासाठी पुढे पाठवले आहेत. नागरिकांनी जागरूक राहावे. गुरांना आपल्या गोठ्यात बांधून ठेवावे. याघटनेमुळे वनविभाग सतर्क राहील.- मिलिंद राऊत, वनपरिक्षेत्र अधिकारी, श्रीवर्धन

गुरुवारी रात्रीच्या वेळी बाइकस्वाराने वाघ दिल्याचे सांगितले आम्ही तात्काळ तिकडे गेलो असता वाघ पळून गेल्याचे निदर्शनास आले मात्र काळोख असल्याने पुढे गेलो नाही. तात्काळ वनविभागाला कळविले व अधिकाऱ्यांनी देखील भेट दिली.-   ग्रामस्थ, दांडगुरी.

टॅग्स :TigerवाघRaigadरायगड