शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
7
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
8
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
9
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
10
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
11
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
12
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
13
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
14
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
15
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
16
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
17
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
18
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
19
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
20
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

गाव-पाड्यांत पाच दिवसांनी टँकर; टंचाईग्रस्त गावांत पाणीपुरवठ्यात अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 00:15 IST

तालुक्यातील पाणीटंचाईने कळस गाठला असून ग्रामीण आणि आदिवासी पाड्यांतील महिलांना पाण्यासाठी मैलोनमैल भटकंती करावी लागत आहे.

- विजय मांडेकर्जत : तालुक्यातील पाणीटंचाईने कळस गाठला असून ग्रामीण आणि आदिवासी पाड्यांतील महिलांना पाण्यासाठी मैलोनमैल भटकंती करावी लागत आहे. शासनाने सुरू केलेले टँकर पाच ते आठ दिवसांनी टंचाईग्रस्त गावात आणि वाडीत पोहचत असल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. पाण्याच्या शोधासाठी भटकावे लागत असल्याने त्यांच्या उद्योग व्यवसायावरही परिणाम होत आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.तालुक्यात पाणीटंचाईची स्थिती गंभीर आहे. त्यामुळे किमान महिनाभर टंचाईग्रस्त भागातील जनतेचे टँकरने पाणी मिळावे म्हणून प्रस्ताव पाठविण्यात आले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने निर्णय घेऊन, तालुक्यात ३ गावे आणि १५ आदिवासी वाड्यांना टँकरचे पाणीपुरवठा करण्यात येईल, असा निर्णय जिल्हाधिकारी यांनी १८ मार्च २०१९ रोजी घेतला. त्यासाठी मनोज ओसवाल यांच्या मालकीचा (एमएच ०२ के ७००२) आणि कान्हू मालू खडके यांच्या मालकीचा ( एमएच ४६ ई ४२३२) टँकरचे अधिग्रहण करण्यात आले आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत हे दोन्ही टँकर पाणीपुरवठा करण्यासाठी मंजूर करण्यात आले होते. प्रत्यक्षात ४ एप्रिलपासून हे दोन टँकर तालुक्यातील टंचाईग्रस्त मोग्रज, धामणी, पिंगळस या तीन गावांना तसेच १५ आदिवासी वाड्यांना टँकरने पाणी पुरविणार आहे. त्यात भक्ताचीवाडी, भल्याचीवाडी, जांभूळवाडी, मेचकरवाडी, चौधरवाडी, खानंद, सागाचीवाडी, धामणदांड, भूतीवली, बोरीचीवाडी, चिंचवाडी, पालीधनगरवाडी, मोरेवाडी आणि ताडवाडी अशा १५आदिवासी वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू केला.सरकारी दर परवडत नसल्याने टँकर ठेकेदार आपली वाहने देतो, पण प्रत्यक्ष पाणीपुरवठा करताना वेळेवर करीत नाही. गेल्या महिनाभरात पाणीटंचाई दूर करण्यासाठी शासनाने ज्या गावात - वाड्यात टँकर पाठविण्याचे आदेश दिले आहेत. त्या ठिकाणी १५ आदिवासी वाड्या आणि ४ गावांत टँकर दिवसाआडही गेलेला नाही. टँकर मंजूर झालेल्या आदिवासी वाड्यात कर्जत तालुका आदिवासी ठाकूर कातकरी संघटनेच्या वतीने कार्यकर्ते पाठवून चौकशी सुरू केली. त्यावेळी शासनाकडून पाच ते आठ दिवसातून एकदा पाणीपुरवठा होत असल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे संतप्त आदिवासी समाजाच्या कर्जत तालुका पदाधिकाऱ्यांनी १४ मेपासून कर्जत तहसील कार्यालयाबाहेर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.कर्जत तालुक्यात मार्च महिन्यापासून पाणीटंचाईचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. पाणीटंचाई निर्माण झाल्याने टंचाईग्रस्त गावे-वाड्यातील ग्रामस्थांनी टँकरची मागणी करण्यास सुरुवात केली होती. १२ मार्च २०१९ रोजी पहिल्यांदा टँकरची मागणी करणारे प्रस्ताव कर्जत पंचायत समितीकडे पोहचले होते. मार्चअखेर टँकरची मागणी करणाºया प्रस्तावाची संख्या १८ वर गेली.शासनाकडून मूलभूत सुविधाही पुरवल्या जात नाहीत. आम्हाला हक्काचे पाणी देखील शासन देत नसल्याने आम्हाला संविधानाने दिलेल्या अधिकाराप्रमाणे सनदशीर मार्गे आंदोलन करावे लागेल.- जैतू पारधी, अध्यक्ष,आदिवासी ठाकूर कातकरी समाज३ एप्रिलपासून टँकरने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले असले तरी भोपळेवाडी, जांभूळवाडी, मॉग्रेज ग्रामपंचायतीमधील नंदकरपाडा येथे टँकर द्यावेत, असा प्रस्ताव प्रलंबित आहे.

गाव-पाड्यांत पाच दिवसांनी टँकर; टंचाईग्रस्त गावांत पाणीपुरवठ्यात अडचणी- विजय मांडेकर्जत : तालुक्यातील पाणीटंचाईने कळस गाठला असून ग्रामीण आणि आदिवासी पाड्यांतील महिलांना पाण्यासाठी मैलोनमैल भटकंती करावी लागत आहे. शासनाने सुरू केलेले टँकर पाच ते आठ दिवसांनी टंचाईग्रस्त गावात आणि वाडीत पोहचत असल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. पाण्याच्या शोधासाठी भटकावे लागत असल्याने त्यांच्या उद्योग व्यवसायावरही परिणाम होत आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.तालुक्यात पाणीटंचाईची स्थिती गंभीर आहे. त्यामुळे किमान महिनाभर टंचाईग्रस्त भागातील जनतेचे टँकरने पाणी मिळावे म्हणून प्रस्ताव पाठविण्यात आले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने निर्णय घेऊन, तालुक्यात ३ गावे आणि १५ आदिवासी वाड्यांना टँकरचे पाणीपुरवठा करण्यात येईल, असा निर्णय जिल्हाधिकारी यांनी १८ मार्च २०१९ रोजी घेतला. त्यासाठी मनोज ओसवाल यांच्या मालकीचा (एमएच ०२ के ७००२) आणि कान्हू मालू खडके यांच्या मालकीचा ( एमएच ४६ ई ४२३२) टँकरचे अधिग्रहण करण्यात आले आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत हे दोन्ही टँकर पाणीपुरवठा करण्यासाठी मंजूर करण्यात आले होते. प्रत्यक्षात ४ एप्रिलपासून हे दोन टँकर तालुक्यातील टंचाईग्रस्त मोग्रज, धामणी, पिंगळस या तीन गावांना तसेच १५ आदिवासी वाड्यांना टँकरने पाणी पुरविणार आहे. त्यात भक्ताचीवाडी, भल्याचीवाडी, जांभूळवाडी, मेचकरवाडी, चौधरवाडी, खानंद, सागाचीवाडी, धामणदांड, भूतीवली, बोरीचीवाडी, चिंचवाडी, पालीधनगरवाडी, मोरेवाडी आणि ताडवाडी अशा १५आदिवासी वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू केला.सरकारी दर परवडत नसल्याने टँकर ठेकेदार आपली वाहने देतो, पण प्रत्यक्ष पाणीपुरवठा करताना वेळेवर करीत नाही. गेल्या महिनाभरात पाणीटंचाई दूर करण्यासाठी शासनाने ज्या गावात - वाड्यात टँकर पाठविण्याचे आदेश दिले आहेत. त्या ठिकाणी १५ आदिवासी वाड्या आणि ४ गावांत टँकर दिवसाआडही गेलेला नाही. टँकर मंजूर झालेल्या आदिवासी वाड्यात कर्जत तालुका आदिवासी ठाकूर कातकरी संघटनेच्या वतीने कार्यकर्ते पाठवून चौकशी सुरू केली. त्यावेळी शासनाकडून पाच ते आठ दिवसातून एकदा पाणीपुरवठा होत असल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे संतप्त आदिवासी समाजाच्या कर्जत तालुका पदाधिकाऱ्यांनी १४ मेपासून कर्जत तहसील कार्यालयाबाहेर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.कर्जत तालुक्यात मार्च महिन्यापासून पाणीटंचाईचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. पाणीटंचाई निर्माण झाल्याने टंचाईग्रस्त गावे-वाड्यातील ग्रामस्थांनी टँकरची मागणी करण्यास सुरुवात केली होती. १२ मार्च २०१९ रोजी पहिल्यांदा टँकरची मागणी करणारे प्रस्ताव कर्जत पंचायत समितीकडे पोहचले होते. मार्चअखेर टँकरची मागणी करणाºया प्रस्तावाची संख्या १८ वर गेली.शासनाकडून मूलभूत सुविधाही पुरवल्या जात नाहीत. आम्हाला हक्काचे पाणी देखील शासन देत नसल्याने आम्हाला संविधानाने दिलेल्या अधिकाराप्रमाणे सनदशीर मार्गे आंदोलन करावे लागेल.- जैतू पारधी, अध्यक्ष,आदिवासी ठाकूर कातकरी समाज३ एप्रिलपासून टँकरने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले असले तरी भोपळेवाडी, जांभूळवाडी, मॉग्रेज ग्रामपंचायतीमधील नंदकरपाडा येथे टँकर द्यावेत, असा प्रस्ताव प्रलंबित आहे.

टॅग्स :Waterपाणी